सिनेमासाठी जमा केलेला हजारो डॉलरचा फंड मजामस्तीवर उडवला

By Admin | Updated: September 30, 2016 14:35 IST2016-09-30T14:13:33+5:302016-09-30T14:35:26+5:30

तीन सिनेनिर्मात्यांनी यू-टयूबच्या माध्यमातून तब्बल 75,000 डॉलरचा फंड गोळा केला. पण यातील एकही दमडी त्यांनी सिनेमावर खर्ची केली.

Thousands of dollars funded for the movie flew fun | सिनेमासाठी जमा केलेला हजारो डॉलरचा फंड मजामस्तीवर उडवला

सिनेमासाठी जमा केलेला हजारो डॉलरचा फंड मजामस्तीवर उडवला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.30 -सिनेमा जरी कमी बजेटचा असला तरी सिनेनिर्मितीतून बक्कळ पैसा कमवून चंगळ करता येते. मग पुढे तो सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकू दे किंवा नको, याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. अशी शक्कल लढवून तीन सिनेनिर्मात्यांनी यू-टयूबच्या माध्यमातून तब्बल 75,000  डॉलरचा फंड जमा केला. पण यातील एकही दमडी त्यांनी सिनेमावर खर्ची केली. सर्वसामान्यांकडून जमवलेली ही हजारो डॉलरची ही रक्कम त्यांनी चक्क इटलीमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी उडवली. हे सर्व जर तुम्हाला खरे वाटत असेल, तर जरा थांबा...
 
हॉलिवूडमधील 'एफएनडी फिल्म'ने याच विषयावर आधारित सिनेमाची निर्मिती केली आहे. इट्स ऑल गुड (It’s All Good) असे या सिनेमाचे नाव आहे.  सिनेमात फिल्ममेकर्सची भूमिका पार पाडणारे तीन जण कशापद्धतीने सिनेमासाठी फंड जमा करतात. हाच फंड ते इटलीमध्ये महागडी कार लिमोनिझमधून फिरणे, आणि शेम्पेनसारख्या गोष्टींवर कसा उडवतात. इटलीमधील मजामस्तीचे माहिती आणि फोटो सोशल मीडियावर स्वतःहूनच पोस्ट करुन कसे अडचणीत येतात. या तिघांवर फंड देणारी मंडळी कशाप्रकारे संतापतात, ही सर्व धम्माल-मस्ती या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.
 
एकूणच न शूट झालेल्या सिनेमाची गोष्ट या सिनेमामध्ये दाखवण्यात येणार आहे.  या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. 'इट्स ऑल गुड' हा सिनेमा 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 

 

Web Title: Thousands of dollars funded for the movie flew fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.