‘अवताराची गोष्ट’ने सांगता
By Admin | Updated: December 26, 2014 11:32 IST2014-12-26T01:28:30+5:302014-12-26T11:32:12+5:30
अवताराची गोष्ट’ या चित्रपटाने २०१४ची सांगता होत आहे. या चित्रपटाला राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला आहे.

‘अवताराची गोष्ट’ने सांगता
राज चिंचणकर, मुंबई
‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटाने २०१४ची सांगता होत आहे. या चित्रपटाला राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला आहे. वर्षाच्या शेवटच्या शुक्रवारी रसिकांना या चित्रपटाची भेट मिळत आहे.
‘अवताराची गोष्ट’ने या वर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही पुरस्कार पटकावला आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन नितीन दीक्षित यांचे आहे. सुलभा देशपांडे,
आदिनाथ कोठारे, लीना भागवत आदी कलावंतांसह मिहिरेश जोशी व यश कुलकर्णी या बालकलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक नितीन दीक्षित सांगतात, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा राज्य पुरस्कार आम्हाला मिळाला याचा निश्चितच आनंद आहे.
राष्ट्रीय पुरस्कारानंतर महत्त्वाचा असा हा राज्य पुरस्कार आहे. या कथेचा जर्म माझ्या डोक्यातच होता. यातला जो लहान मुलगा आहे तो लहानपणाचा मीच आहे. दोन परस्परविरुद्ध ध्रुवांवरचे व्यक्तीनिहाय विचार यात आहेत. हा चित्रपट म्हणजे आत्मविचारांचे द्वंद्व आहे, असेही नितीन यांनी सांगितले.