‘हे’ चित्रपट आहेत, हॉलिवूडपटाची कॉपी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 16:27 IST2017-05-21T10:57:47+5:302017-05-21T16:27:47+5:30
आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची कथा ‘पायरेट्स आॅफ दी कॅरेबियन’ या हॉलिवूडपटापासून उचलली असल्याची चर्चा आहे. आमिर ...

‘हे’ चित्रपट आहेत, हॉलिवूडपटाची कॉपी!!
आ िर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची कथा ‘पायरेट्स आॅफ दी कॅरेबियन’ या हॉलिवूडपटापासून उचलली असल्याची चर्चा आहे. आमिर खानने मात्र हा दावा खोटा ठरवला आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ कुठल्याही चित्रपटाची कॉपी नाही वा कुठल्याही चित्रपटाशी साम्य साधणारी कथा नाही. ही एकदम ताजी कथा असल्याचे आमिरने म्हटले आहे. आपण अनेक अॅक्शन अॅडवेंचर सिनेमे बघितले. याचा अर्थ ते सगळेच कुठल्या तरी चित्रपटाची कॉपी होते का? असा सवालही आमिरने केला आहे. आमिरच्या या प्रश्नात किती तथ्य ते आम्हाला ठाऊक नाही. पण बॉलिवूडचे अनेक सिनेमे हॉलिवूडपटाचा अधिकृत रिमेक नाही तर कॉपी आहेत, हे सत्य आहे. अशाच काही चित्रपटांवर एक नजर....
ट्युबलाईट
![]()
‘ट्युबलाईट’ हा सलमान खानचा आगामी सिनेमा ‘द लिटील बॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी असल्याचे कळतेय. कबीर खान याने चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच एक हॉलिवूडपट या चित्रपटाची प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.
कोई मिल गया
![]()
‘कोई मिल गया’ हा हृतिक रोशन स्टारर चित्रपट ‘ईटी’ या हॉलिवूडपटाचा रिमेक होता. केवळ आपला एलियन जादू हा त्यांच्या चित्रपटातील एलियनपेक्षा अधिक क्यूट होता.
जिस्म
![]()
बिपाशा बासूचा ‘जिस्म’ हा सिनेमा ‘बॉडी हिट’ या इंग्रजी सिनेमापासून प्रेरित होता. या चित्रपटात एका पत्नीची कथा आहे. जी आपल्या पतीपासून समाधानी नसते आणि त्यामुळे विवाहबाह्य संबंध बनवते.
ब्लॅक
![]()
संजय लीला भन्साळींचा ‘ब्लॅक’ हा शानदार सिनेमा सुद्धा एका इंग्रजीपटाची कॉपी होता. तुम्ही तो इंग्रजीपट पाहाल तर ‘ब्लॅक’ला विसराल.
रंगीला
![]()
राम गोपाल वर्मा यांचा ‘रंगीला’ या चित्रपटाची कथाही एका इंग्रजी चित्रपटावरून उचलली गेली होती. एक टपोरी मुलगा, एक फिल्मस्टार आणि एक स्टार बनलेली सामान्य मुलगी यांचा प्रेमत्रिकोण यात दाखवला गेला होता.
सत्ते पे सत्ता
![]()
अमिताभ बच्चन यांचा गाजलेला ‘सत्ता पे सत्ता’ हा सिनेमा ‘सेवेन ब्राईड्स’या हॉलिवूडपटावर बेतलेला होता. अर्थात ‘सत्ता पे सत्ता’ चांगलाच मजेदार होता.
आराधना
![]()
राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ हा चित्रपट एका हॉलिवूडपटाची कॉपी होता. ‘आराधना’ चित्रपट प्रचंड गाजला होता.
संघर्ष
![]()
अक्षय कुमार , प्रीति झिंटा यांचा ‘संघर्ष’ हा सिनेमा ‘द सायलेन्स आॅफ द लँब्स’पासून प्रेरित होता. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. पण हा एक दमदार चित्रपट होता, यात शंका नाही
खून भरी मांग
![]()
राकेश रोशन दिग्दर्शित ‘खून भरी मांग’ या चित्रपटातील रेखाचे पात्र ‘रिटर्न टू इडन’ या चित्रपटातील पात्रापासून प्रेरित होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
जो जिता वहीं सिकंदर
![]()
आमिर खानचा ‘जो जिता वही सिकंदर’ हा सिनेमा ‘ब्रेकिंग अवे’ या चित्रपटावर आधारित होता.
फॅन
![]()
‘फॅन’ हा शाहरूख खानचा अलीकडे येऊन गेलेला चित्रपट याच नावाच्या इंग्रजीपटावर आधारलेला होता. हा चित्रपट फार चालला नाही. पण यातील शाहरूखच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.