इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दिसला द ग्रेट खली, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:56 IST2025-02-24T18:56:24+5:302025-02-24T18:56:53+5:30
The Great Khali : खली व्हिडिओमध्ये बांधकामाच्या ठिकाणी इतर कामगारांसोबत काम करताना दिसत आहे. त्याच्या हातात फावडे असून घमेल्यात दगडी भरताना दिसत आहे.

इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दिसला द ग्रेट खली, व्हिडीओ होतोय व्हायरल
WWE दिग्गज द ग्रेट खली( The Great Khali)ची फॅन फॉलोइंग खूप आहे. लोकांना तो खूप आवडतो. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याला खूप फॉलो करतात. खलीही सोशल मीडियावर चाहत्यांसाठी व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दिसत आहे. खलीला फावड्याने काम करताना पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि ते खूप चिंता व्यक्त करत आहेत.
खली व्हिडिओमध्ये बांधकामाच्या ठिकाणी इतर कामगारांसोबत काम करताना दिसत आहे. त्याच्या हातात फावडे असून घमेल्यात दगडी भरताना दिसत आहे. खलीला काम करताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हैराण झाले. खलीने या व्हिडिओसोबत एक ऑडिओ ऐकायला मिळत आहे. तळवे चाटून चमकलो नाही मेहनतीची बाब आहे. जळणारे जळत राहा. प्रेम करणारे सोबत आहेत, असे ऑडिओत म्हटलं आहे.
चाहते झाले हैराण
खलीच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, तुम्ही काहीही म्हणा, सरांना गर्व नाही. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, याला म्हणतात कष्टाची भाकरी खाणे. आणखी एकाने लिहिले की, सर आम्हीही तुमच्यासोबत आहोत. खलीचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी लाइक केला आहे. इतरांनी लिहिले की, माणूस दोन भाकरीसाठी सर्व काही करतो.
महाकुंभात केले स्नान
द ग्रेट खली नुकताच महाकुंभेत सहभागी झाला होता. तिथे त्याने शाही स्नानही केले. खलीला महाकुंभला पाहताच त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्याचा महाकुंभातील व्हिडिओही व्हायरल झाला होता. खलीने आता WWE मधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शेवटचे २०२३ मध्ये रिंगमध्ये प्रवेश केला होता. खलीला शेवटच्या वेळी रिंगमध्ये पाहून लोक खूप उत्साहित झाले होते.