सर्वांसमोर अमृता रावला या अभिनेत्रीनं लगावली होती थापड अन् म्हणाली 'याच लायकीची आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:33 PM2023-03-27T22:33:23+5:302023-03-27T22:36:29+5:30
Amrita Rao : बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टार्समध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळते. तर दुसरीकडे गैरसमजांमुळे अभिनेत्रींमधील कॅटफाईटच्या बातम्याही येत असतात.
बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टार्समध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळते. तर दुसरीकडे गैरसमजांमुळे अभिनेत्रींमधील कॅटफाईटच्या बातम्याही येत असतात. असेच काहीसे ईशा देओल (Esha Deol) आणि अमृता राव(Amrita Rao)च्या बाबतीत घडले. खरं तर, अभिनेत्रीने अमृताच्या गालावर जाहीरपणे थापड लगावली. खुद्द ईशानेही एका मुलाखतीत या गोष्टीची पुष्टी केली होती.
खरं तर ही घटना आहे २००६ सालची. जेव्हा दोघी इंद्र कुमारच्या 'प्यारे मोहन' चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यामुळेच दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून जोरदार भांडण झाले होते. हे भांडण इतके वाढले की ईशा चिडली आणि अमृता रावला थापड लगावली. ईशाने एका मुलाखतीत सांगितले की, 'पिकअपच्या एक दिवसानंतर अमृताने दिग्दर्शक इंद्र कुमारसमोर मला शिवीगाळ केली. जे ऐकून मला वाटले की आता तिने मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे मी चिडले आणि तिला थापड लगावली. पण मला याबद्दल काहीही पश्चाताप नाही. कारण तिच्या वर्तणूकीमुळी ती याच लायकीची होती.
यादरम्यान ईशाने असेही सांगितले होते की, अमृताने नंतर तिची माफी मागितली होती आणि ईशानेही तिला माफ केले होते. त्यामुळेच त्यावेळी दोघांमध्ये काहीही झाले तरी आता दोघांमध्ये चांगले नाते निर्माण झाले आहे. या दोघांशिवाय फरदीन खान आणि विवेक ओबेरॉय देखील 'प्यारे मोहन'मध्ये दिसले होते. हा चित्रपट 'सी नो एविल हिअर नो एविल' या अमेरिकन चित्रपटावर आधारित होता.