४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:34 IST2025-05-09T09:34:16+5:302025-05-09T09:34:50+5:30
४१ वर्षीय अभिनेता सध्या अभ्यासात व्यग्र आहे. लवकरच तो पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये असेल. त्याने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.

४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
'सनम तेरी कसम', 'हसीन दिलरुबा' आणि 'तारा वर्सेस बिलाल' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) हा हिंदी आणि तेलुगू चित्रपटांतील रायझिंग स्टार्सपैकी एक आहे. हर्षवर्धन राणे इंडस्ट्रीमध्ये साधे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला ग्लॅमर आणि दिखाव्यापासून दूर राहणे आवडते. ४१ वर्षांचा हा अभिनेता सध्या अभ्यासात व्यग्र आहे. लवकरच तो पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये असेल. त्याने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.
हर्षवर्धन राणे त्याच्या आगामी 'दिवानियात' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र सध्या तो परिक्षेची तयारी करतो आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करून सांगितले आहे. त्याने म्हटले की त्याची परीक्षा जूनमध्ये आहे, ज्यासाठी तो कठोर अभ्यास करत आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे, जूनमध्ये मानसशास्त्रच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा आहेत. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू आहे, ती म्हणजे मला चांगले करायचे आहे. शेअर केलेल्या फोटोत हर्षवर्धन राणे अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेल्या नोट्स वाचताना दिसत आहेत.
४१ वर्षीय अभिनेता मानसशास्त्रात पदवी घेत आहे आणि त्याने आधीच त्याचे ज्ञान चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो नोट्स तयार करताना दिसत आहे. लोक तिच्या सुंदर हॅंड रायटिंगचे कौतुक करत आहेत. तसेच त्याच्या आगामी रोमँटिक चित्रपट 'दीवानियात'चे चित्रीकरण देखील सुरू आहे. तो प्रत्येक क्षणाची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत राहतो. या सिनेमाबद्दल त्याने सांगितले की, हा आगामी चित्रपट त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मजबूत पटकथांपैकी एक आहे. परंतु, या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही.
शूटिंगच्या १० व्या दिवसाचे फोटो शेअर करताना हर्षवर्धनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी आतापर्यंतची सर्वात मजबूत पटकथा, मुश्ताक शेख यांनी लिहिलेली आहे आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी आहेत जे ही अद्भुत कथा सांगण्यास उत्सुक आहेत. सोनम बाजवा एक प्रामाणिक आणि अद्भुत अभिनेत्री आहे. निर्माता म्हणून अंशुल लाजवाब आहे.