"थलायवा"ला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलाकडून धमकी
By Admin | Updated: May 13, 2017 12:07 IST2017-05-13T11:43:58+5:302017-05-13T12:07:54+5:30
मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलानं रजनीकांत यांना धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. काय दिली आहे धमकी?

"थलायवा"ला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलाकडून धमकी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - "थलायवा" रजनीकांत यांचा आगमी सिनेमा मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या आयुष्यावर आधारित असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, रजनीकांत आगामी सिनेमामुळे नाही तर भलत्याच वादामुळे सध्या चर्चेत आहेत.
हाजी मस्तानचा दत्तक पुत्र असल्याचा दावा करणा-या सुंदर शेखर नावाच्या व्यक्तीनं रजनीकांत यांना धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. शेखरनं सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेल्या नोटीसमध्ये त्यानं म्हटलं आहे की, "मस्तान यांना सिनेमात एक तस्कर किंवा डॉनच्या भूमिकेत दाखवण्याची चूक करू नये".
तसंच धमकी देणारा व्हिडीओ मेसेजही त्यानं रजनीकांत यांना पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये शेखरनं म्हटले आहे की, मिस्टर रजनीकांत, हाजी मस्तानच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय ही चांगली बाब आहे. मात्र लक्षात ठेवा तुमच्या आगामी सिनेमात हाजी मस्तानची प्रतिमा खलनायकाच्या स्वरुपात दाखवण्यात आली तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला याची भरपाई द्यावी लागेल. आमची माणसं तुम्हाला सोडणार नाही, ती तुमच्यासमोर काही-न्-काही समस्या निर्माण करतील.
धमकी देताना शेखरनं पुढे असेही म्हटले आहे की, "हाजी मस्तानला तस्कर आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या रुपात सिनेमात दाखवणं ही बाब आमच्यासाठी अपमानकारक आहे व ही ते आम्हाला मान्यदेखील नाही. हाजी मस्तानला तस्करी किंवा अंडरवर्ल्डमधील कोणत्याही कारवायांमुळे कुठल्याही न्यायालयानं कधीही दोषी ठरवलेले नाही".
Sunder Shekhar, man claiming to be late Haji Mastan’s son sends notice to Rajinikanth,asks him not to depict Mastan as a smuggler & don pic.twitter.com/jVWbvMsSEB— ANI (@ANI_news) May 13, 2017
There is speculation that Rajinikanth"s next film with director Pa Ranjith will be based on the life of Mumbai underworld don Haji Mastan— ANI (@ANI_news) May 13, 2017