थायलंड विसरा; पाहा :‘सौ आसमाँ’चा देसी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 11:19 IST2016-09-06T05:49:26+5:302016-09-06T11:19:26+5:30

थायलंडपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात हा देसी अंदाज सुंदर आणि मनाला भावणारा वाटला. ही रोमँटिक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Thailand visara; See: 'Hundred Asmans' Desi Style! | थायलंड विसरा; पाहा :‘सौ आसमाँ’चा देसी अंदाज!

थायलंड विसरा; पाहा :‘सौ आसमाँ’चा देसी अंदाज!

 
बार बार देखो’ मधील गाणे सध्या धूम करत आहेत. त्यातील ‘काला चश्मा’,‘सौ आसमाँ’,‘नच दे न सारे’,‘ दरियाँ’ हे गाणे आत्तापर्यंत आऊट करण्यात आले आहेत. ‘सौ आसमाँ’ या गाण्याचे चित्रीकरण थायलंडमध्ये अतिशय सुंदर ठिकाणी करण्यात आले आहे.

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्यांनी जयपूर, दिल्ली याठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. आणि नुकतेच ते चंदीगढमध्ये प्रमोशनसाठी आले आहेत.

तिथे त्यांनी ‘सौ आसमाँ को’ या गाण्यावर ऊसाच्या शेतांमध्ये डान्स केला. थायलंडपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात हा देसी अंदाज सुंदर आणि मनाला भावणारा वाटला. ही रोमँटिक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नित्या मेहरा दिग्दर्शित ‘बार बार देखो’ चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.






 

Web Title: Thailand visara; See: 'Hundred Asmans' Desi Style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.