कंगनाला परीक्षेचे टेन्शन
By Admin | Updated: June 30, 2014 22:15 IST2014-06-30T22:15:05+5:302014-06-30T22:15:05+5:30
परीक्षा भल्याभल्यांची झोप उडवते. असेच काहीसे सध्या अभिनेत्री कंगना रानावतचे झाले आहे.

कंगनाला परीक्षेचे टेन्शन
>परीक्षा भल्याभल्यांची झोप उडवते. असेच काहीसे सध्या अभिनेत्री कंगना रानावतचे झाले आहे. तिचीही सध्या झोप उडाली आहे. सध्या ती चित्रपटांबाबत नव्हे, तर तिच्या परीक्षेबाबत जास्त विचार करताना दिसते. स्क्रिन प्ले आणि स्क्रीप्ट रायटिंगचे शिक्षण घेण्यासाठी ती न्यूयॉर्क येथे गेली आहे. लवकरच तिला या विषयाची परीक्षा द्यायची आहे. एखादे काम हाती घेते, तेव्हा ते पूर्णत्वास नेल्याशिवाय ती राहत नाही. सध्या ती रात्री जागूनच परीक्षेची तयारी करत आहे.