‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मालिकेत येणार दोन वर्षांचा लिप! ‘

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 07:01 AM2018-03-06T07:01:58+5:302018-03-06T12:31:58+5:30

‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ (शशी सुमित प्रॉडक्शन्स) मालिकेतील कनक (रिहा शर्मा) आणि उमाशंकर (अविनाश रेखी) यांची कथा दिवसेंदिवस लोकप्रिय ...

'You, Suraj, I will come to Shazia Piazi' two years old lip! ' | ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मालिकेत येणार दोन वर्षांचा लिप! ‘

‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मालिकेत येणार दोन वर्षांचा लिप! ‘

googlenewsNext
ू सूरज,मैं साँझ पियाजी’ (शशी सुमित प्रॉडक्शन्स) मालिकेतील कनक (रिहा शर्मा) आणि उमाशंकर (अविनाश रेखी) यांची कथा दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे.या मालिकेचे उत्कंठावर्धक कथानक आता लवकरच नवे वळण घेणार आहे.हे नवे वळण म्हणजे,मालिकेच्या कथानकाचा काळ दोन वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. मीरा मिठल (कंगना शर्मा) या नव्या व्यक्तिरेखेच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार असल्याचे संकेत प्रेक्षकांना मिळाले होते.आता आम्हाला असे कळले आहे की कथानक दोन वर्षांनी पुढे नेण्यापूर्वीच त्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे.ती म्हणजे कनक आणि उमा हे विभक्त होणार आहेत आणि त्याचे कारण त्यांच्या नात्यात मीराचा झालेला प्रवेश.सध्याच्या कथानकानुसार मीरा ही उमाच्या प्रेमात पडली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,“लवकरच उमाशंकर मीराशी लग्न करणार आणि त्या टप्प्यावर मालिकेच्या कथानकाचा काळ दोन वर्षांनी पुढे नेण्यात येणार असा ट्रॅक रसिकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने कंगना शर्मा टीव्ही मालिकांमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेसाठी कंगनाला करारबध्द करण्यात आले आहे.तिच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकाला नवे वळण मिळणार असून कनक आणि उमाशंकरचे जीवन पालटून जाणार आहे.“टीव्ही मालिकेत मी प्रथमच भूमिका साकारणार असल्याने मला त्याची खूपच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.या मालिकेसाठी करार केल्यानंतर मी ही मालिका नियमितपणे पाहात असून तिच्या चित्रीकरणाचा आम्ही लवकरच प्रारंभ करू.प्रेक्षकांना माझी भूमिका आणि माझं काम आवडेल, अशी आशा करते,” असे कंगना म्हणाली.

'दीया और बाती हम' मालिकेचा सिक्वेल ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंहची एंट्री होण्याची शक्यता आहे.बाळाच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कधी ऑनस्क्रीन परतणार याचीच चाहते वाट पाहात होते.तुर्तास मिळालेल्या माहितीनुसार मालिकेत दोन वर्षांच्या लिप दाखवण्यात येणार त्यावेळी दीपिकाची एंट्री मालिकेत झाल्यास या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'You, Suraj, I will come to Shazia Piazi' two years old lip! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.