स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप, "येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत पाहायला मिळणार धक्कादायक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:18 PM2021-08-19T16:18:16+5:302021-08-19T16:19:37+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे.

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Wedding Track Will Shocked You, Know Why | स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप, "येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत पाहायला मिळणार धक्कादायक वळण

स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप, "येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत पाहायला मिळणार धक्कादायक वळण

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये आता नलूने देखील ओम आणि स्वीटूच्या लग्नाला परवानगी दिली आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत.

नुकताच ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झालेला प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं. मालिकेत आता लग्नाची धमाल पाहायला मिळणार आहे. मालिकेत स्वीटू आणि ओम लवकरच लग्नबंधनात अडकणार असा ट्रॅक पाहायला मिळणार. लग्नासोहळ्याचा विशेष भागाचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत.

या विशेष भागात स्वीटू आणि ओम यांचा लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का? मालविका जी स्वीटू आणि ओम यांच्या नात्याने कधीच खुश नव्हती. स्वीटू खानविलकरांची सून होऊ नये यासाठी मालविकाने आजवर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. पण आता मालविका ओम आणि स्वीटूचं नातं मान्य करेल कि या लग्न सोहळ्यात देखील मोहित सोबत मिळून हे लग्न थांबवण्यासाठी काही वेगळा प्लॅन करेल? ओम मालविकाचा डाव उधळून लावेल? मालविकाचा खरा चेहरा ओम समोर येईल का? ओम आणि स्वीटूच लग्न सुरळीत संपन्न होऊन मालविकाच्या मनाविरुद्ध स्वीटू खानविलकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करेल का? २२ तारखेला होणाऱ्या भागात सगळ्या प्रश्नांचे उत्तरं उलगडणार आहेत.

बोंबला,येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या इतक्या महत्त्वाच्या सीनमध्ये झाली मोठी चूक, प्रचंड होतेय ट्रोल

स्वीटूने साखरपुड्याला लाल रंगाची साडी नेसली होती. साडी बघून मालविका तिला या साडीबद्दल विचारते. तेव्हा स्वीटू हा शालू तिच्या आईच्या म्हणजेच नलूच्या लग्नातील असल्याचं सांगते.तर दुसरा व्हायरल झालेला व्हिडीओ हा नलू मावशीची साडी पाहून मालविक सारखाच प्रश्न विचारते. खूप दिवस कपाटातच होती का? तेव्हा नलू मावशी म्हणते हो हा माझ्या लग्नातला शालू आहे. तुमच्याकडे यायेच होते म्हणून मुद्दामून नेसलीय. दोन्ही व्हिडीओ समोर येताच नेटीझन्सनी व्हिडीओतली चूक पकडली. नेटीझन्सना एकाच मालिकेत होणारी इतकी मोठी चूक झाल्याचे उमगताच प्रचंड खिल्ली उ

Web Title: Yeu Kashi Tashi Mi Nandayla Wedding Track Will Shocked You, Know Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.