घाडगे & सून मालिकेत खंडेरायाच्या आशीर्वादाने होणार का अक्षय-अमृताच्या नव्या नात्याची सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 09:47 IST2018-02-10T04:17:10+5:302018-02-10T09:47:10+5:30

कलर्स मराठीवरचा घाडगे & सून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. या मालिकेतील अक्षय ...

Will Akshay-Amruta's new relationship begin with Khanderaa in the Ghadge & Soon series? | घाडगे & सून मालिकेत खंडेरायाच्या आशीर्वादाने होणार का अक्षय-अमृताच्या नव्या नात्याची सुरुवात?

घाडगे & सून मालिकेत खंडेरायाच्या आशीर्वादाने होणार का अक्षय-अमृताच्या नव्या नात्याची सुरुवात?

र्स मराठीवरचा घाडगे & सून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. या मालिकेतील अक्षय नुकताच एका जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. आता अक्षय-अमृताचे नवरा-बायकोचे नाते खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. घाडगेंच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. पण लग्नापासूनच अक्षय-अमृताच्या लग्नात अनेक विघ्न आल्याने हा पारंपारिक विधी मात्र राहून गेला होता. मात्र नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने आता या विधीसाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीसाठी रवाना झालंय. या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. पण अक्षयला मात्र हा विधी अमृतासोबत करणं थोडसे कठीण जातंय. तर तिकडे अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे. खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. आता अक्षय हा विधी करणार का? अमृताला उचलून अक्षय ही परंपरा निभावणार का? खंडोबाच्या आशीर्वादाने अक्षय-अमृताचे नाते खुलणार का? हे सगळे प्रेक्षकांना घाडगे & सून या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
अखेर अक्षय अपघातातून सुखरूप बचावल्यानंतर मृदालाने बोललेला नवस फेडण्यासाठी अखेर घाडगे जेजुरीला जायला निघालेत. देव दर्शनासोबतच घाडग्यांच्या जुन्या गावातल्या घरातले काही सुंदर क्षण देखील अमृतला अनुभवायला मिळणार आहेत. चुलीवर जेवण शिजवणं, चांदण्या रात्रीत मोकळ्या अंगणात गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी अमृता अनुभवणार आहे. या ट्रीपमध्ये अक्षयसोबत घालवलेल्या काही निवांत क्षणांमुळे कदाचित अक्षय-अमृताचे नातही अजून खुलणार आहे... तर दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा कुठली नवी खेळी खेळणार आहे हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रिती-भाती शिकता-शिकता अमृता घाडग्यांचे संस्कार, परंपरा कशा शिकणार अशी सगळी धमाल प्रेक्षकांना येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
घाडगे & सून या मालिकेत अक्षयची भूमिका चिन्मय उद्गीरकर, अमृताची भूमिका भाग्यश्री लिमये तर माईंची भूमिका सुकन्या कुलकर्णी साकारत आहेत. 

Also Read : घाडगे & सून फेम भाग्यश्री लिमयेचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: Will Akshay-Amruta's new relationship begin with Khanderaa in the Ghadge & Soon series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.