कोण आहे शुभांगीची नवी हेअरस्टायलिस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 17:44 IST2016-10-29T17:44:36+5:302016-10-29T17:44:36+5:30
शुभांगी अत्रे भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत आहे. अंगुरी भाभीची भूमिका पूर्वी शिल्पा शिंदे ...
.jpg)
कोण आहे शुभांगीची नवी हेअरस्टायलिस्ट?
श भांगी अत्रे भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत आहे. अंगुरी भाभीची भूमिका पूर्वी शिल्पा शिंदे साकारत होती. तिने या भूमिकेला एका उंचीवर नेवून ठेवले होते. त्यामुळे शिल्पाची जागा कोणतीही अभिनेत्री घेऊ शकत नाही असेच सगळ्यांचे मत होते. शिल्पाने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टिआरपी ढासळेल असेही अनेकांना वाटत होते. पण या भूमिकेचे आव्हान शुभांगी अत्रेने पेलले. शिल्पाची जागा आता तिने घेतली असून प्रेक्षकांना ही नवीन अंगुरी भाभी खूपच आवडत आहे. शिल्पाचा या मालिकेत जसा लूक होता, तसाच लूक या मालिकेत शुभांगीचाही कायम ठेवण्यात आला आहे. पण पुढील काही भागात प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात शुभांगी पाहायला मिळणार आहे. अंगुरी आणि विभूतीचे लग्न होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी शुभांगीचा लूक हा मैंने प्यार किया या चित्रपटातील सुमनप्रमाणे म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्रीप्रमाणे असणार आहे. या मालिकेतील तिची अाता दाखवण्यात येणारी हेअरस्टाईल ही तिच्या मुलीने सुचवली आहे. सध्या तिची मुलगीच तिची हेअरस्टायलिस्ट आहे. याविषयी शुभांगी सांगते, "माझ्या मुलीला माझ्या केसाच्या वेण्या घालायला खूप आवडतात. एकदा मुलीशी खेळत असताना तिने माझ्या सुंदर वेण्या घातल्या होत्या. चित्रीकरणाला वेळ होत असल्याने मी तशीच सेटवर गेली. खरे तर मी वेण्या सोडल्या नाहीत हे माझ्या लक्षातच आले नाही. त्यावेळी माझ्या या वेण्यांचे सगळ्यांनी कौतुक केले होते. त्यामुळे आता हीच माझी हेअरस्टाईल आम्ही मालिकेत वापरण्याचे ठरवले आहे."