कोण बाजी मारेल स्मिता कि सुशांत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:10 IST2018-05-24T09:19:05+5:302018-05-24T15:10:04+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगला मर्डर मिस्ट्री हा टास्क. ज्यामध्ये आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये ...

Who is Baji Marel Smita that Sushant? | कोण बाजी मारेल स्मिता कि सुशांत ?

कोण बाजी मारेल स्मिता कि सुशांत ?

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगला मर्डर मिस्ट्री हा टास्क. ज्यामध्ये आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले. तसेच काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघाचा वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये रेशम, सुशांत, जुई सगळ्यांनीच तिला केक भरवला आणि शुभेच्छा दिल्या. सई आणि तिच्यामध्ये झालेली कट्टी फु देखील संपल्याचे दिसून आले. या दरम्यान मेघाने बिग बॉसकडे एक इच्छा व्यक्त केली होती. ज्यामध्ये तिने म्हटले होते कि, तिला मर्डर मिस्ट्री या टास्क मध्ये खुन्याची भूमिका करण्यास आवडेल. बिग बॉस यांनी मेघाची ही इच्छा वाढदिवस असल्याने कबूल देखील केली. त्यामुळे टास्कमध्ये आस्ताद बरोबर मेघाला देखील खुनी बनण्याची संधी मिळाली. आज वेळ आहे सुशांत आणि स्मिता जे या टास्क मध्ये गुप्तहेर आहेत ते बिग बॉस यांना पुराव्यानिशी कोण खुनी आहे हे सांगण्याची. तेव्हा हा खटला बघणे रंजक असणार आहे.
 
स्मिता आणि सुशांत हे त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्यानुसार आस्ताद आणि मेघाला प्रश्न विचारणार आहेत. कारण, गुप्तहेरांना पुरावे सापडले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण प्रश्न असा आहे का, ते दोघे मेघा आणि आस्तादवर लागलेल्या आरोपांना सिद्ध करू शकतील का ? सुशांत आणि स्मिता त्याचे म्हणणे बिग बॉस समोर आज मांडणार असून आता बिग बॉसचा निर्णय काय असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. या टास्कमध्ये स्मिता किंवा सुशांत कोण मारणार बाजी ? कोणाला मिळणार संधी बिग बॉस मराठीच्या घराच्या कॅप्टनशिपसाठी उमेदवार म्हणून उभे रहाण्याची ? याची उत्तर आज मिळणार आहेत. तसेच आज बिग बॉस मराठीच्या सदस्यांना प्रश्न पडला आहे कि, SR म्हणजे कोण आहे ? कारण बिग बॉस यांनी काही सामान पाठवले आहे आणि त्यावर SR असे लिहिलेले आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना हा प्रश पडला आहे  कि, कोणी गेस्ट म्हणून घरामध्ये येणार आहे का ?

Web Title: Who is Baji Marel Smita that Sushant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.