सलील अंकोलाच्या फिटनेसचे रहस्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 17:12 IST2016-10-29T17:12:41+5:302016-10-29T17:12:56+5:30
सलील अंकोलाने एक क्रिकेटर म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. कोरा कागज या मालिकेत त्याने रेणूका ...

सलील अंकोलाच्या फिटनेसचे रहस्य काय?
स ील अंकोलाने एक क्रिकेटर म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. कोरा कागज या मालिकेत त्याने रेणूका शहाणेसोबत प्रमुख भूमिका साकारली. त्याची ही मालिका आणि भूमिका त्यावेळी खूपच गाजली होती. त्यानंतर त्याने कुुरुक्षेत्र, चुरा लिया है तुमने यांसारख्या चित्रपटात काम केले. आता तो शनी या मालिकेत सूर्यदेवाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सलील आपल्याला खूप फिट असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने त्याच्या शरीरयष्ठीवर खूप मेहनत घेतली अाहे. सलील सांगतो, "मी फिटनेसच्याबाबतीत नेहमीच सतर्क होतो. पण गेल्या काही वर्षांत मी माझ्या तब्येतीकडे चांगलेच दुर्लक्ष केले होते. पण पॉवर कपल या कार्यक्रमात मी माझ्या पत्नीसोबत सहभागी झालो होतो. त्यावेळी माझ्यासोबत असलेले अनेक स्पर्धक अतिशय फिट होते. त्यांना पाहून आपणदेखील फिट होणे गरजेचे आहे असे मला वाटले. प्रत्येक कलाकारासाठी आपली शरीरयष्ठी टिकवणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मीदेखील माझे शरीर अतिशय फिट बनवायचे ठरवले. पॉवर कपल हा कार्यक्रम संपल्यानंतर मी दुसरा कोणताही कार्यक्रम अथवा मालिका स्वीकारली नसल्याने माझ्याकडे पुरेसा वेळ होता. त्यामुळे मी माझे सगळे लक्ष माझे फिटनेसकडे दिले. मी अनेक तास जिममध्ये गाळला आणि त्यामुळेच आज माझे शरीर इतके फिट झाले आहे. आता मी शनी या मालिकेचे चित्रीकरण उमरगावमध्ये करत असल्याने आमच्याकडे रिकामा वेळ नसतो. पण जो काही वेळ मला मिळतो, तो सगळा वेळ मी जिममध्ये व्यायाम करण्यात घालवतो. तसेच प्रोडक्शन हाऊस माझ्या खाण्याची विशेष काळजी घेतात. मला वेळेवर माझ्या डाएटनुसार ते जेवण देतात."