कुमकुम भाग्य या मालिकेतील रुची सवर्णला काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 06:10 AM2017-08-31T06:10:52+5:302017-08-31T11:46:34+5:30

कुमकुम भाग्य या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी रुची सवर्ण मोहनची एंट्री झाली आहे. रुची या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत ...

What is the interest of this series of Kumkum Bhagya? | कुमकुम भाग्य या मालिकेतील रुची सवर्णला काय झाले?

कुमकुम भाग्य या मालिकेतील रुची सवर्णला काय झाले?

googlenewsNext
मकुम भाग्य या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी रुची सवर्ण मोहनची एंट्री झाली आहे. रुची या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. रुचीने प्यार का बंधन या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक हिंदी मालिकांसोबत मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सख्या रे, सखी यांसारख्या मराठी मालिकांमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सख्या रे या मालिकेनंतर ती आता पुन्हा हिंदी मालिकेकडे वळली आहे.
कुमकुम भाग्य ही मालिका नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल राहिली आहे. या मालिकेत रुचीची एंट्री झाल्यापासून या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे धमाल मस्तीचे फोटो ती तिच्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत आहे. तसेच तिच्या सहकलाकारांसोबतचे फोटो देखील ती अपलोड करत असते. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत ती अतिशय त्रासलेली दिसत आहे आणि त्याचसोबत लेहेंगे के बोज तली में असे कॅप्शन देखील तिने दिले आहे. 
रुचीने या मालिकेच्या चित्रीकरणासाठी नुकताच एक भरजरी लेहेंगा घातला होता. या लेहेंगाचे वजन खूपच जास्त असल्याने या वजनामुळे मी दबली गेली आहे असे तिने मस्करीत म्हटले आहे. तिच्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत आहेत. तसेच अनेक जण यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत.
रुची लेहेंगामुळे त्रासली असली तरी त्या गेटअपमध्ये ती खूपच छान दिसत आहे.  

Also Read : रुची सवर्ण मोहन म्हणतेय, माझ्यासाठी पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे

Web Title: What is the interest of this series of Kumkum Bhagya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.