स्त्रीच्या मनात नक्की कोणते विचार सुरू असतात जाणून घ्या ‘हर मर्द का दर्द’ फेम नकुल मेहता आणि गौतम रोडे यांच्याकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:03 IST2017-02-20T08:33:12+5:302017-02-20T14:03:12+5:30

एका सकाळी उठल्यावर तुमच्या शेजारी असलेल्या स्त्रीच्या मनातील विचार तुम्हाला कळले, तर तुम्हाला काय वाटेल? डीजेज क्रिएटिव्ह युनिटचे दिया ...

What are the thoughts in the mind of the woman? Know 'Every man's pain' by Fame Nakul Mehta and Gautam Rode | स्त्रीच्या मनात नक्की कोणते विचार सुरू असतात जाणून घ्या ‘हर मर्द का दर्द’ फेम नकुल मेहता आणि गौतम रोडे यांच्याकडून

स्त्रीच्या मनात नक्की कोणते विचार सुरू असतात जाणून घ्या ‘हर मर्द का दर्द’ फेम नकुल मेहता आणि गौतम रोडे यांच्याकडून

ा सकाळी उठल्यावर तुमच्या शेजारी असलेल्या स्त्रीच्या मनातील विचार तुम्हाला कळले, तर तुम्हाला काय वाटेल? डीजेज क्रिएटिव्ह युनिटचे दिया आणि टोनीसिंह यांच्या सहकार्याने निर्मिती केलेली ‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का दर्द’ या मालिकेत एका पंजाबी कुटुंबाची कथा सांगण्यात आली आहे. मालिकेचा नायक विनोद खन्ना (फैझल रशीद) हा सतत आपली पत्नी सोनू (झिनल बेलाणी) हिला कसे खुश ठेवायचे या विवंचनेत पडलेला असतो. तो त्यासाठी देवीची अखंड प्रार्थना करतो आणि देवीही त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वर देते की त्याच्या आजूबाजूला असलेल्या महिलांचे विचार त्याला ऐकू येतील. पण या वरदानामुळे त्याचे जीवनच बदलून जाते. ही शक्ती ही खरेच वरदान ठरेल का? आता तो महिलांना वेगळ्य़ा पध्दतीने वागवील काय? त्याचे त्याच्या पत्नीवरील प्रेम वाढेल का? तो जगातील सर्वात सुखी पुरुष ठरेल का? तुला जर या विनोद खन्नासारखी विशेष शक्ती प्राप्त झाली, तर तू काय करशील, असे अभिनेता नकुल मेहता याला विचारले असता तो म्हणाला, “ही विशेष शक्ती कुतुहलजनक नक्कीच वाटते. त्यामुळे मला माझ्या पत्नीचं मन अधिक

चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. पत्नी सुखी असेल, तर जीवनही सुखी होईल आणि या शक्तीमुळे मला एरवी इतर कोणत्याही पुरुषाला जे जमलं नाही, ते साध्य करता येईल, असं वाटतं.” याच प्रश्नावर गौतम रोडे म्हणाला, “स्त्रीच्या मनात नक्की कोणते विचार सुरू असतात, ते जाणून घेणं हे नक्कीच मजेचं
ठरेल. मग ती स्त्री एक व्यावसायिक असेल, माझी सहकलाकार असेल, महिला दिग्दर्शक किंवा निर्माती असेल किंवा माझी पत्नी असेल. मला अशी विशेष शक्ती प्राप्त झाली, तर नक्कीच आवडेल.”

Web Title: What are the thoughts in the mind of the woman? Know 'Every man's pain' by Fame Nakul Mehta and Gautam Rode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.