​विक्रम गोखलेंनी बालपण देगा देवा या मालिकेद्वारे केले कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 12:18 IST2017-05-03T06:33:59+5:302017-05-03T12:18:37+5:30

विक्रम गोखले हे आज केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, ...

Vikram Gokhalei will give childhood childhood done by this series | ​विक्रम गोखलेंनी बालपण देगा देवा या मालिकेद्वारे केले कमबॅक

​विक्रम गोखलेंनी बालपण देगा देवा या मालिकेद्वारे केले कमबॅक

क्रम गोखले हे आज केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांममध्येदेखील त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात ते ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या भूमिकेत झळकले होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. 
विक्रम गोखले यांनी पूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले आहे. या सुखानो या या मालिकेनंतर ते छोट्या पडद्यावर झळकलेच नाही. पण आता ते अनेक वर्षांनंतर पुन्हा मालिकेत झळकणार आहेत. 
कलर्स मराठी वाहिनीवर बालपण देगा देवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना त्यांना पाहायला मिळणार आहे. आजोबा आणि नातीच्या हळूवार नात्यावर आधारित या मालिकेची कथा असणार आहे. 
अस्स सासर सुरेख बाई ही मालिका गेली अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानीस यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. बालपण देगा देवा ही मालिका अस्स सासर सुरेख बाईची जागा घेणार असल्याची चर्चा आहे. 
बालपण देगा देवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत विक्रम गोखले यांच्यासोबत कोण कोण कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे. 

Web Title: Vikram Gokhalei will give childhood childhood done by this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.