​वर्षा उसगांवकर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 16:21 IST2017-01-13T16:21:51+5:302017-01-13T16:21:51+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नायिका वर्षा उसगांवकर लवकरच प्रेक्षकांना एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिने मराठी चित्रपटात काम करण्यासोबतच तिरंगा, ...

Varsha Usgaonkar's shortback on small screens | ​वर्षा उसगांवकर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

​वर्षा उसगांवकर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

ाठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नायिका वर्षा उसगांवकर लवकरच प्रेक्षकांना एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिने मराठी चित्रपटात काम करण्यासोबतच तिरंगा, हफ्ता बंद यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच ती अनहोनी, अलविदा डार्लिंग, तन्हा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ती हिंदी मालिकांपासून दूर आहे. 
आता ती जमाई राजा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जमाई राजा या मालिकेत लवकरच दोन नवीन एंट्री होणार आहेत. वर्षा उसगांवकर आणि नीलू कोहली या मालिकेत आता झळकणार आहेत. वर्षा या मालिकेत क्रितिका बुवाची तर नीलू क्रितिकाच्या सासूची भूमिका साकारणार आहे. क्रितिका आपल्या भाच्याचा शोध घेताना प्रेक्षकांना दिसणार आहे. तिचा भाचा हा सत्या म्हणजेच रवी दुबे असल्याचे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. सत्या आपला भाचा आहे हे कळल्यावर क्रितिका त्याला आणि माहीला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. आपल्या भूमिकेविषयी वर्षा सांगते, "मी याआधी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. 2007नंतर मी कोणतीच हिंदी मालिका केली नाही. मी मालिकांमध्ये काम करावे अशी माझ्या फॅन्सची नेहमीच इच्छा होती. मला भेटल्यावर माझे फॅन्स मला सतत याबद्दल विचारत असत. त्यामुळे ही मालिका मी माझ्या फॅन्ससाठी करत आहे. जमाई राजा ही खूपच प्रसिद्ध मालिका आहे. अशा प्रसिद्ध मालिकेचा मी भाग होत असल्याने मी खूपच खूश आहे. क्रितिका ही अतिशय प्रेमळ आहे. ती आपल्या भाच्याचा शोध घेऊन त्याला सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे." 

Web Title: Varsha Usgaonkar's shortback on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.