​बापमाणूस या मालिकेच्या कथानकाला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:34 IST2018-04-23T08:04:17+5:302018-04-23T13:34:17+5:30

झी युवा या वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये युथफूल कटेन्ट असल्याने कमी वेळातच या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या ...

The turn of the story will be found in the story of Basuanus | ​बापमाणूस या मालिकेच्या कथानकाला मिळणार हे वळण

​बापमाणूस या मालिकेच्या कथानकाला मिळणार हे वळण

युवा या वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये युथफूल कटेन्ट असल्याने कमी वेळातच या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेवरील अनेक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील कलाकारांनी देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात एक घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
सध्या मालिकेत गीता आणि सूर्या यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव दोघानांही होत आहे. पण गीताची सूर्याच्या घरात घुसमट होत असल्याचं सूर्याला जाणवतंय. सुजाता गीताला तिची पायरी ओळखून वागायला सांगतेय, तसेच तिचा या घरावर काही हक्क नाही आहे त्यामुळे गीताने तिचा रुबाब कमी करून मुकाटपणे घरात राहावं असं देखील सुजाता गीताला बजावते. तिच्या अशा बोलण्यामुळे दुखावल्या गेलेल्या गीताला सूर्या घराच्या बाहेर घेऊन येतो आणि तिने गप्प बसण्याऐवजी ओरडावं-रडावं आणि तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यावी असे सूर्या गीताला सांगतो. त्याचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर गीताला रडू कोसळतं, नकळतपणे तिच्या मनात साचलेल्या भावना तिच्या अश्रूंवाटे बाहेर पडतात. गीता सूर्याला मिठी मारून रडते. सूर्या देखील तिला कवेत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. सूर्या आणि गीता एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करू शकतील का? त्यांच्या दोघांमधील प्रेम बहरेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना
बापमाणूस या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. 
बापमाणूस या मालिकेत रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ  यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना ही मालिका आणि मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड आवडत आहेत. आता या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. या मालिकेला मिळालेल्या वळणानंतर मालिकेची कथा अधिक रंजक होणार आहे. 

Also Read : जाणून घ्या सुयश टिळकने अक्षया देवधर आणि त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांबद्दल काय सांगितले?

Web Title: The turn of the story will be found in the story of Basuanus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.