बिग बॉसच्या घरात आज मेघा, पुष्कर आणि भूषणला आज काय मिळणार सरप्राईझ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 12:30 IST2018-06-13T07:00:07+5:302018-06-13T12:30:07+5:30

 कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रिलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या ...

Today Megha, Pushkar and Bhushan will get what they got in the Big Boss house today? | बिग बॉसच्या घरात आज मेघा, पुष्कर आणि भूषणला आज काय मिळणार सरप्राईझ ?

बिग बॉसच्या घरात आज मेघा, पुष्कर आणि भूषणला आज काय मिळणार सरप्राईझ ?

 
लर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रिलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच सई, रेशम, स्मिता आणि आऊ यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. रेशमची मुलगी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली आणि तिने सगळ्यांना आपलेसे केले. तसेच स्मिताच्या आईने देखील स्मिताला बरेच सल्ले दिले तिचे मार्गदर्शन केले आणि तिचे मनोबल वाढवले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहे भूषण, मेघा आणि पुष्करच्या घरातील सदस्य. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूषणचा मुलगा त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे. तसेच मेघाची आई आणि मुलगी साक्षी येणार आहेत. सगळ्यात मोठं सरप्राईझ पुष्करला मिळणार आहे कारण त्याच्या बायको सोबतच त्याची चिमुकली मुलगी देखील या घरामध्ये येणार आहे. तिला बघून सगळेच खूप खुश होणार आहेत. कालचा तसेच आजचा दिवस बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना खूपच भाऊक करणार ठरणार आहे यात शंका नाही.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही,म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली. या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा,भूषण हे नॉमिनेट झाले तर घराची कॅप्टन सईला एका विशेष अधिकार देण्यात आला ज्यानुसार ती कोणत्याही एका सदस्याला या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट करू शकते आणि सईने स्मिताला नॉमिनेट केले. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे. 

Web Title: Today Megha, Pushkar and Bhushan will get what they got in the Big Boss house today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.