आज बिग बॉसच्या घरात रंगणार “थेंबे थेंबे तळे साचे”चा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 12:31 IST2018-05-15T07:01:53+5:302018-05-15T12:31:53+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून ...

Today, the game of "Thube Dropy Pale Saatchi" will be played in the Big Boss house | आज बिग बॉसच्या घरात रंगणार “थेंबे थेंबे तळे साचे”चा खेळ

आज बिग बॉसच्या घरात रंगणार “थेंबे थेंबे तळे साचे”चा खेळ

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून आले. काल रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉस यांनी सरप्राईझ दिले. राजेश घरी परतला. रेशम राजेशला घरी परतल्याचे बघून खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला. तसेच राजेश सिक्रेट रूम मध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत ? हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील ? कोणाची भांडण होतील ? कोण संयम राखून खेळेल ? हे बघणे रंजक असणार आहे. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य. पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्या अंतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. जेंव्हा पाणी सोडण्यात येईल तेव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात येणार आहेत. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे.

 

Web Title: Today, the game of "Thube Dropy Pale Saatchi" will be played in the Big Boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.