'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता दिसणार नाही हा कलाकार, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:09 AM2022-06-23T11:09:43+5:302022-06-23T11:10:19+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात आलेला दुरावा अखेर मिटला आहे.

This artist will no longer be seen in the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता दिसणार नाही हा कलाकार, समोर आलं मोठं कारण

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता दिसणार नाही हा कलाकार, समोर आलं मोठं कारण

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata). यातील ट्विस्टमुळे या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अखेर या मालिकेत गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात आलेला दुरावा अखेर मिटला आहे. दरम्यान आता या मालिकेत एक कलाकार काम करताना दिसणार नाही. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार (Ashwini Kasar). 

अभिनेत्री अश्विनी कासार हिने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मानसीची भूमिका साकारली होती. या मालिकेत आता ती पाहायला मिळणार नाही. या मागचे कारण म्हणजे या मालिकेतील तिचा ट्रॅक संपला आहे. नुकताच तिने गौरी आणि जयदीपसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि लिहिले की, आणि अखेर ते आनंदी आयुष्य जगत आहेत. (काही काळापुरतं). मला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत. तिने या मालिकेतील निर्माते, कलाकार आणि इतर मंडळींचे आभार मानले आहेत. तसेच तिने हे मिस करत असल्याचेही सांगितले.


सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अखेर जयदीपला त्याची खरी गौरी मिळाली आहे. खऱ्या गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. भलेही गौरीला जीवे मारण्याचे आरोप मानसी आणि अनिल त्यांच्यावर घेत असले. तरीदेखील माई, जयदीप आणि गौरी यांना माहित आहे की, या सगळ्याचा सूत्रधार शालिनी वहिनी आहे. त्यामुळे माई गौरीला तू गीताच्या स्टाईलमध्ये तिला समज दे असे सांगतात. गौरीदेखील शालिनीला सक्त ताकीद देते. त्यामुळे आता शालिनी पुन्हा काही कारस्थान करते का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: This artist will no longer be seen in the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.