मेहनतीशिवाय पर्याय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 11:46 IST2016-08-23T06:15:37+5:302016-08-23T11:46:08+5:30
बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेत प्रियांशू जोरा अभिषेकची भूमिका साकारत आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना अभिषेक हार्मोनिका वाजवताना ...
.jpg)
मेहनतीशिवाय पर्याय नाही
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेत प्रियांशू जोरा अभिषेकची भूमिका साकारत आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना अभिषेक हार्मोनिका वाजवताना दिसणार आहे. प्रियांशूला संगीताची तितकीशी आवड नसल्याने त्याने आतापर्यंत कधीच कोणते वाद्य वाजवलेले नाही. पण मालिकेत हार्मोनिका वाजवताना ते खोटे वाटू नये यासाठी सध्या तो हार्मोनिका शिकवण्याचे धडे घेत आहे. याविषयी प्रियांशू सांगतो, "मला मालिकेत हार्मोनिका वाजवायचे आहे हे कळल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी हार्मोनिका विकत घेतली. त्यानंतर हार्मोनिका शिकवण्यासाठी मी एक ट्युटर शोधला. मी चित्रीकरण संपल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशी ट्युटरकडून हार्मोनिका वाजवायला शिकत असे. आता तर चित्रीकरणादरम्यान ब्रेकमध्येदेखील मी हार्मोनिका वाजवण्याचा सराव करतो."