'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:59 PM2023-05-31T16:59:38+5:302023-05-31T17:00:14+5:30

महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची मिळणार साथ

The grand finale of 'Mi Honar Superstar Jallosh Juniors' will be held on this day | 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी

'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी

googlenewsNext

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या मंचावरील बच्चे कंपनीचे टॅलेण्ट थक्क करणारे आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट आणि ट्रायो असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर सादर झाले. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ३ आणि ४ जूनला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 

जळगावचा सागर आणि दिव्येश, कल्याणचा झीरो डिग्री क्रू ग्रुप, कराडचा डी टू डी क्वीन्स ग्रुप, पुण्याची श्रीमयी सूर्यवंशी आणि पिंपरीच्या सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची साथ मिळणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, रंग माझा वेगळाची दीपा, शुभविवाह मालिकेतली भूमी, लग्नाची बेडीमधील सिंधू आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत.

टॉप ५ स्पर्धकांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार

सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, सई-शरयू आणि श्रीमयी सूर्यवंशी या स्पर्धकांमधून अंतिम विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टॉप ५ स्पर्धकांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार अनुभवायचा असेल तर मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ३ आणि ४ जूनला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: The grand finale of 'Mi Honar Superstar Jallosh Juniors' will be held on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.