'सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधी'ची मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:56 PM2023-09-28T12:56:52+5:302023-09-28T12:57:47+5:30

Sindhutai Mazi Mai - Goshta Chindhichi : सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधीची ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. चिंधीची आई आणि तिचे काका चिंधीचं लग्न लावण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री होणार आहे.

The entry of this actress in the serial 'Sindhutai Mazi Mai Gosht Chindhichi' | 'सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधी'ची मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री

'सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधी'ची मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री

googlenewsNext

कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधीची (Sindhutai Mazi Mai - Goshta Chindhichi) ही मालिका कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतून सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मालिकेत चिंधीचा बालपणीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. वडिलांची सिंधुताईंना वेळोवेळी साथ मिळाली. आता लवकरच मालिकेत चिंधीचे लग्न होणार आहे. त्यामुळे मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. चिंधीची आई आणि तिचे काका चिंधीचं लग्न लावण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री होणार आहे. 

चिंधीच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या सावळे झळकताना दिसणार आहेत. लागिरं झालं जी या लोकप्रिय मालिकेत विद्या सावळे यांनी खाष्ट सासुची भूमिका केली होती. या मालिकेतून विद्या सावळे घराघरात पोहचल्या होत्या. मात्र कमी मानधनाच्या कारणामुळे विद्या सावळे यांनी मालिकेतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर त्या मोजक्या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या. पण आता विद्या सावळे पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


एक नवीन भूमिका, एक नवीन आव्हान असे म्हणत त्यांनी या भूमिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे. तर त्यांच्या मुलाची हरबाची भूमिका अभिनेता अतुल आगलावे निभावताना दिसणार आहे. अतुल आगलावेने बऱ्याच चित्रपट, मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मोलकरीण बाई मालिकेतील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. 

Web Title: The entry of this actress in the serial 'Sindhutai Mazi Mai Gosht Chindhichi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.