तेजश्री प्रधानचं २ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:38 AM2023-07-29T11:38:28+5:302023-07-29T11:38:47+5:30

अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tejashree Pradhan's comeback on the small screen after 2 years, in the series Zhalkanar, watch the promo | तेजश्री प्रधानचं २ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत, पाहा प्रोमो

तेजश्री प्रधानचं २ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत, पाहा प्रोमो

googlenewsNext

महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून एका नव्या अंदाजात तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच तिच्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात तेजश्रीने मुक्ताची भूमिका केली आहे. तिच्या आईची भूमिका शुभांगी गोखलेंनी साकारली आहे. मुक्तासाठी आई स्थळ बघत असते. ती वर्तमान पत्रातील जाहिरात दाखवते. त्यावर मुक्ता म्हणते की, ही वधू कधीच आई होऊ शकत नाही. याबद्दल लिहिलंय का कुठे. तर दुसरीकडे सागर ज्याची पत्नी नाही आणि त्याला एक मुलगी आहे. त्याची आईदेखील त्याच्यासाठी दुसरी पत्नी शोधत आहे. मात्र तोदेखील इंटरेस्ट घेत नाही. सागरची लेक आणि मुक्ता मध्ये छान बॉण्डिंग आहे. त्यामुळे ते एकत्र येतील का, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

नवी भूमिका सकारात्मकच असेल
या नव्या भूमिकेविषयी तेजश्री म्हणाली, ‘मी ठरवून एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणे टाळते. देवाच्या कृपेने प्रेक्षक माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पहात असतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतलाय. गेले कित्येक दिवस पुन्हा कधी भेटीला येणार याविषयी विचारणा होत होती. स्टार प्रवाहवर लवकरच एका नव्या मालिकेतून मी भेटीला येणार आहे हे सांगताना अतिशय आनंद होतोय. मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं. माझी नवी भूमिका देखील सकारात्मकच असेल.

ती पुढे टेलिव्हिजन हे माझं आवडतं माध्यम आहे. खरतर कोरोना नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सोशल मीडियाचं महत्त्वही दिवसेंदिवस वाढत आहे. मी या सर्वच गोष्टी पुन्हा एकदा नव्याने अनुभवतेय. प्रामाणिकपणे काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले आहे आणि यापुढे देखिल करत राहिन. प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. जवळपास १२ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही मालिका केली होती. काही दिवसांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे.
 'प्रेमाची गोष्ट' ही नवी मालिका सोमवार ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Tejashree Pradhan's comeback on the small screen after 2 years, in the series Zhalkanar, watch the promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.