दमनप्रीतला शिकवण्यासाठी शिक्षकच येतात मालिकेच्या सेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:09 IST2017-03-21T09:52:21+5:302017-03-21T16:09:01+5:30
‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेत दमनप्रीतसिंग हा बालकलाकार रणजितसिंग यांची भूमिका साकारतोय मात्र अभिनय क्षेत्रात एंट्री केल्यानंतर आभ्यासाकडे ...

दमनप्रीतला शिकवण्यासाठी शिक्षकच येतात मालिकेच्या सेटवर
‘ ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेत दमनप्रीतसिंग हा बालकलाकार रणजितसिंग यांची भूमिका साकारतोय मात्र अभिनय क्षेत्रात एंट्री केल्यानंतर आभ्यासाकडे दुर्लक्ष होते अशी नेहमीच बालकलाराविषयी म्हटले जाते मात्र दमनप्रित अभिनय सांभाळत शाळाही शिकतोय. याविषयी तो म्हणतो “मी चंदिगडचा रहिवासी आहे. पण या मालिकेसाठी मी मुंबईत ऑडिशन दिली होती. चित्रीकरणासाठी मला अभ्यासाला सोडचिठ्ठी द्यावी लागली नाही. मला शिकवायला एक शिक्षक रोज सेटवर येतात आणि दोन-तीन तास मला शिकवितात.मी सध्या नववीत शिकतो आहे. मी पंजाबचा असून महाराजा रणजितसिंग हेही पंजाबीच होते. म्हणूनच या मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मी सोडली नाही. मला जेव्हा या मालिकेबद्दल कळलं, तेव्हा रणजितसिंग यांची ही भूमिका मलाच साकारावीशी वाटत होती,” असे दमनप्रीतने सांगितले.आपण बरीच वर्षं पंजाबी सिनेमांमधून भूमिका साकारीत आहोत, असे दमनप्रीतने सांगितले. “मी सात किंवा आठ वर्षांचा होतो, तेव्हापासून मी चित्रपटांतून भूमिका साकारीत आहे.यापूर्वी मी काही पंजाबी सिनेमांमध्ये काम केले आहे.दिलजित दूसांज आणि गुरप्रीत गुग्गी यासारख्या पंजाबातील काही बड्य़ा अभिनेत्यांबरोबर मी एकत्र काम केलेलं आहे,”असे दमनप्रीत सांगतो.
पंजाबातील शीख राज्याचे संस्थापक असलेल्या महाराजा रणजितसिंग यांची जीवनकहाणी ‘शेर-ए- पंजाब :महाराजा रणजितसिंग’ या मालिकेतून उलगडणार आहे. “या मालिकेतून खरा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यात निर्मात्यांनी कोणतेही‘सिनेमॅटिक स्वातंत्र्य’ घेतलेले नाही. मी पंजाबी असून मी गटका हा शीख लढाईचा एक प्रकार शिकलो आहे. या मालिकेसाठी मी रोज घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचं प्रशिक्षण घेत होतो,”असे तो म्हणाला.त्याच्याशिवाय या मालिकेत शालीन भानोत, स्नेहा वाघ, रूमी खान, चेतन पंडित आणि सोनिया सिंग यासारखे ज्येष्ठ कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.