'तारक मेहता' फेम दया भाभी दिशा वकानीच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या तिच्या नवऱ्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:35 PM2021-06-02T16:35:57+5:302021-06-02T16:36:22+5:30

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालालची पत्नी दया बेन भलेही दिसत नसली तरी आजही तिची लोकप्रियता कायम आहे.

'Taraq Mehta' fame Daya Bhabhi Disha Wakani's wedding photos went viral, find out about her husband | 'तारक मेहता' फेम दया भाभी दिशा वकानीच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या तिच्या नवऱ्याबद्दल

'तारक मेहता' फेम दया भाभी दिशा वकानीच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या तिच्या नवऱ्याबद्दल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालालची पत्नी दया बेन भलेही दिसल नसली तरी आजही तिची लोकप्रियता कायम आहे. दया भाभीची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने केली आहे. आपला अभिनय आणि विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात ती यशस्वी ठरली आहे. जेठालाल आणि तिची जोडी लोकांना खूप भावते. सध्या दिशा वकानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी मालिकेमुळे नाही तर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 


दयाभाभी म्हणजेच दिशा वकानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दिशाचे चाहते तिचे फोटो शेअर करत आहेत. या फोटोत दिशा सुंदर वधूच्या गेटअपमध्ये दिसते आहे. दिशा लग्नात खूपच अप्रतिम दिसते आहे.
दिशा वकानीने आपल्या लग्नात व्हाईट सिल्क साडी परिधान केली आहे, या साडीला लाल बॉर्डर आहे आणि पदर लाल रंगाचा आहे. साडीवर जरीकाम केलेले पहायला मिळते आहे. या आउटफिटला मॅचिंग ज्वेलरी तिने घातली आहे.


दिशा वकानीने मयुर पडियासोबत २०१५ साली लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर दिशाने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून ती तारक मेहता का उल्टा चष्मामधून गायब आहे.

ती या मालिकेत बऱ्याच वर्षांपासून दिसत नाही. तिचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. बऱ्याचदा ती कमबॅक करत असल्याच्या चर्चांना उधाण येते. मात्र याबद्दल निर्मात्यांकडून काहीच स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.


भलेही दिशा वकानी मालिकेत दिसत नसली तरी दया भाभीची भूमिका आजही लोकप्रिय आहे. मालिकेतच नाही तर सोशल मीडियावर चाहते तिची आठवण काढत असतात. मात्र सध्या दिशा आपली मुलगी आणि कुटुंबाला वेळ देते आहे आणि ती सोशल मीडियापासूनही लांब आहे.

Web Title: 'Taraq Mehta' fame Daya Bhabhi Disha Wakani's wedding photos went viral, find out about her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.