महिलेशी हुज्जत घालणे स्वामी ओमला पडले महागात; आॅडियन्सने दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 17:35 IST2017-01-14T17:25:39+5:302017-01-14T17:35:10+5:30

बिग बॉस सिझन-१०चे सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम हे बाहेरील दुनियेतही वादग्रस्त ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेत सहभागी झालेल्या स्वामी ओमच्या वादग्रस्त वाणीमुळे संतापलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली होती. आता पुन्हा असाच काहींसा प्रसंग घडला असून, यावेळेस लाइव्ह कार्यक्रमात महिलेशी हुज्जत घातल्याने स्वामी ओमला आॅडियन्सने चक्क चोप दिल्याचे समोर आले आहे.

Swami Omla fell victim to molesting woman; Audiences give up | महिलेशी हुज्जत घालणे स्वामी ओमला पडले महागात; आॅडियन्सने दिला चोप

महिलेशी हुज्जत घालणे स्वामी ओमला पडले महागात; आॅडियन्सने दिला चोप

ग बॉस सिझन-१०चे सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम हे बाहेरील दुनियेतही वादग्रस्त ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेत सहभागी झालेल्या स्वामी ओमच्या वादग्रस्त वाणीमुळे संतापलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली होती. आता पुन्हा असाच काहींसा प्रसंग घडला असून, यावेळेस लाइव्ह कार्यक्रमात महिलेशी हुज्जत घातल्याने स्वामी ओमला आॅडियन्सने चक्क चोप दिल्याचे समोर आले आहे. 



त्याचे झाले असे की, स्वामी ओम यांना एका टीव्ही चॅनेलवरील चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आले होते. चर्चा सुरू असताना स्वामी ओमने आॅडियन्समध्ये बसलेल्या एका महिलेशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील बाचाबाची एवढी वाढली की, स्वामी ओमने त्या महिलेच्या खानदानीचे उणेदुणे काढण्यास सुरुवात केली. चॅनेलची अ‍ॅँकर स्वामी ओमला वारंवार सूचना देत होती की, तुम्ही महिलेशी असे बोलू शकत नाही. मात्र जिद्दीवर पेटलेल्या स्वामी ओमने आपल्या वाच्याळ वाणीवर लगाम न लावता वाट्टेल ते बोलण्यास सुरुवात केली. एवढेच काय तर त्यांच्या एका समर्थकाने त्या महिलेजवळ जाऊन तिला दमही दिला. 

सौजन्य : न्यूज नेशन
स्वामी ओम आणि त्यांच्या समर्थकांची ही कृती स्टुडिओमध्ये असलेल्या संत समितीच्या सदस्यांच्या अजिबात पचनी पडली नाही. समितीच्या एका सदस्याने उठून स्वामी ओमच्या समर्थकाची पिटाई करण्यास सुरुवात केली. बघता-बघता आॅडियन्स स्वामी ओम आणि त्यांच्या समर्थकावर तुटून पडले. त्यामुळे स्टुडिओमध्ये सर्वत्र तुफान हाणामारी सुरू झाली. स्वामी ओम आणि त्यांच्या समर्थकांना असा काही चोप दिला की, स्वामी ओमला दोनदा स्टेजवरून खाली फेकून दिले. 
हा सर्व प्रकार चॅनेलच्या कॅमेºयात कैद झाला. चॅनेलने ५६ सेकंदांचा हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ वाºयासारखा पसरला आहे. 

अ‍ॅँकरच्या तोंडावर फेकले पाणी
गेल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेल्या स्वामी ओमला दररोज कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर चर्चासत्रात बोलावले जात आहे. मात्र प्रत्येक कार्यक्रमात ते हुज्जत घालूनच बाहेर पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी अशाच एका कार्यक्रमात एका व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारल्याची घटना घडली होती. त्यापूर्वीच्या एका टीव्ही कार्यक्रमात स्वामी ओमने अ‍ॅँकरवर पाणी फेकले होते. चर्चा सुरू असताना त्यांनी अ‍ॅँकरच्या तोंडावर पाणी फेकून राग व्यक्त केला होता. त्यानंतर रडत रडत माझ्यावर बिग बॉसच्या घरात अन्याय झाल्याचे ते म्हटले होते. 

Web Title: Swami Omla fell victim to molesting woman; Audiences give up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.