सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांनी केला साखरपुडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 11:00 IST2018-01-03T05:30:44+5:302018-01-03T11:00:44+5:30
सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो ...
.jpg)
सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांनी केला साखरपुडा?
स यश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. सुयश आणि अक्षयाने त्याच्या नात्याबाबत मौन पाळणेच नेहमी पसंत केले आहे. पण आता त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचे म्हटले जात आहे. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामच्या साइटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोवरून अक्षया आणि सुयशने साखरपुडा केला असल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे.
सुयशने त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा हटके अंदाजात दिल्या आहेत. त्याने त्याचा आणि अक्षयाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत अक्षयाने सुयशला मिठी मारल्याचे आपल्याला दिसत आहे. या फोटोत अक्षयाच्या हातात आपल्याला एक छानशी अंगठी पाहायला मिळत आहे. ही अंगठी पाहून त्या दोघांनी साखरपुडा केला का असा प्रश्न लोकांना पडला आहे. या फोटोसोबत सुयशने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम, आनंद सगळीकडे पसरवा असे लिहिले आहे. सुयशने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षयाच्या हातातील सुंदर अंगठी पाहून तुम्ही साखरपुडा केला असल्याचे आम्हाला वाटत आहे अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या लोकांच्या प्रतिक्रियांवर सुयश आणि अक्षयाने काहीच उत्तर दिले नसले तरी ते लवकरच त्यांच्या फॅन्सना याविषयी सांगतील असा त्यांच्या फॅन्सना विश्वास आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. ही व्यक्तिरेखा अक्षया देवधर साकारत असून तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या व्यक्तिरेखेत अंजली बाई आणि राणा यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा होते. पण खऱ्या आयुष्यात या अंजलीबाईंची म्हणजेच अक्षयाची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे. सुयस आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुयशने का रे दुरावा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. सध्या तो बापमाणूस या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
Also Read : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई राणाला नव्हे तर या व्यक्तीला म्हणतात, डार्लिंग