नच बलियेमध्ये सोनाक्षी सिन्हा ऐवजी परीक्षकाच्या खुर्चीवर दिसणार मलायका अरोरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 11:31 IST2017-04-24T12:05:43+5:302017-04-25T11:31:32+5:30

नच बलिये सीझन 8मध्ये सोनाक्षी सिन्हा आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. सोनाक्षी हा रिअॅलिटी शो जज करण्यासाठी खूपच उत्सुक ...

Sunilshi Sinha instead of Malaika Arora will appear on the chair in Nach Baliye | नच बलियेमध्ये सोनाक्षी सिन्हा ऐवजी परीक्षकाच्या खुर्चीवर दिसणार मलायका अरोरा !

नच बलियेमध्ये सोनाक्षी सिन्हा ऐवजी परीक्षकाच्या खुर्चीवर दिसणार मलायका अरोरा !

बलिये सीझन 8मध्ये सोनाक्षी सिन्हा आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. सोनाक्षी हा रिअॅलिटी शो जज करण्यासाठी खूपच उत्सुक होती. मात्र आपल्याला ती आता नचच्या परीक्षकाच्या खुर्चीवर दिसणार नाही. होय, बरोबर वाचलात तुम्ही सोनाक्षी ऐवजी मलायका अरोरा आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच झाले असे की सोनाक्षी सध्या दबंग खानबरोबर बिझी आहे. सलमान खान सध्या  द बँग टूर’ वर गेला आहे. या  द बँग टूर’मध्ये परफॉर्मन्स सादर करण्यासाठी सोनाक्षीने 1 दिवसांची नचमधून सुट्टी घेतलीय. त्यामुळे येणार नचच्या भागात आपल्याला सोनाक्षीच्या खुर्चीवर मलायका अरोरा बसलेली पाहायला मिळणार आहे. नचच्या पहिल्या सीझनचे परीक्षण मलायका अरोराने केले आहे. त्यामुळे हा शो तिच्यासाठी नवा नाही. एक दिवसाची परीक्षक म्हणून ती या मंचावर येणार आहे. नचमध्ये गीता बसरा आणि हरभजन सिंगसुद्धा झळकले होते. हरभजन आणि गीता स्पर्धक म्हणून नव्हे तर गेस्ट परफॉर्मर म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावून गेले. हरभजनच्या आधी युवराज सिंग आणि हेजल किच हे सेलिब्रेटी कपल या कार्यक्रमात झळकणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण युवराज सध्या आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने त्याला या कार्यक्रमाचा भाग होता आले नाही. सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या  नूर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचित्रपटात सोनाक्षीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे.सबा इम्तियाज यांच्या कराची यू आर किलिंग मी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. 

Web Title: Sunilshi Sinha instead of Malaika Arora will appear on the chair in Nach Baliye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.