सुमोना बनणार रिअल लाईफ वाईफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 05:05 IST2016-03-08T12:01:45+5:302016-03-08T05:05:35+5:30
कपिल शर्माची आॅनस्क्रीन वाईफ सुमोना चक्रवर्ती रिअल लाईफमध्येही कुणाची तरी वाईफ बनवण्याच्या तयारीत आहे. सुमोनाने याबाबत अधिकृत घोषणा केली ...

सुमोना बनणार रिअल लाईफ वाईफ
क िल शर्माची आॅनस्क्रीन वाईफ सुमोना चक्रवर्ती रिअल लाईफमध्येही कुणाची तरी वाईफ बनवण्याच्या तयारीत आहे. सुमोनाने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. सुमोनाने तिच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा तिचा ब्रॉयफ्रेंड सम्राट मुखर्जी याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची खबर आहे. सम्राट ४० वर्षांचा आहे. म्हणजे सुमोनापेक्षा ११ वर्ष मोठा. ‘भाई भाई’ व ‘सिकंदर सडक का’ यासारख्या चित्रपटांत त्याने काम केले आहे. सध्या मात्र बंगाली सिनेमावर त्याने लक्ष केंद्रीत केले आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी सुमोना व सम्राट भेटले होते. रिअल लाईफमध्ये अतिशय बिनधास्त असलेल्या सुमोनाचे गौरव चोपडा व अभिनव शुक्ला यांच्यासोबतही नाव जुळले होते.