‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये स्पंदन चतुर्वेदीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 13:45 IST2018-03-02T08:15:45+5:302018-03-02T13:45:45+5:30

‘एक वीर की अरदस- वीरा’ या मालिकेतील छोटी वीरा आठवते का तुम्हाला?आता तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.ती म्हणजे ...

Spandan Chaturvedi entry in 'Kulfikumar Bajwala' | ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये स्पंदन चतुर्वेदीची एंट्री

‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये स्पंदन चतुर्वेदीची एंट्री

क वीर की अरदस- वीरा’ या मालिकेतील छोटी वीरा आठवते का तुम्हाला?आता तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.ती म्हणजे स्पंदन लवकरच ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या ‘स्टार प्लस’वरील आगामी मालिकेत एक भूमिका साकारणार आहे.10 वर्षांच्या स्पंदनने आतापर्यंत विविध भूमिकांमधून आपले अभिनयकौशल्य सिध्द केले असून आता ती ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये एका नकारात्मक झळकणार आहे.मालिकेतील कुल्फी या नायिकेच्या भूमिकेसाठी आकृती शर्मा हिची निवड करण्यात आली असून मालिकेत अंजली आनंद,मोहित मलिक,पल्लवी राव आणि श्रृती शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील.स्पंदनचा स्वत:चा मोठा चाहतावर्ग असल्याने तिलाही या मालिकेत भूमिका देण्यात येणार असल्याचे माहीती मिळते आहे.आधी 'वीरा' आणि नंतर 'उडान'मध्ये चकोरची भूमिका साकारल्यावर आता ही सा-यांची लाडकी अगदी वेगळ्या भूमिकेत पाहण्यास सारेच उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावरील 'उडान' या लोकप्रिय मालिकेत चकोर हे पात्र साकारणारी बालकलाकार स्पंदन चतुर्वेदी हिला ख-या आयुष्यात कुकिंगची विशेष आवड आहे. अलीकडेच  चिमुकलीने  मालिकेच्या सेटवर लाइट हेल्दी नाश्ता तयार केला होता.सा-यांनाच तिने बनवलेला पदार्थ आवडीने खात खूप सारी मजा मस्ती केली.यावेळी स्पंदनने चटकदार भेळ बनवली होती. ती रिअल लाइफमध्ये खूप फुडी आहे.तिला खाण्याची आवड तर आहेच खास करून  घरी बनवलेले जेवणही तिला खूप आवडते. ती सतत तिच्या आईकडून हे पदार्थ कसे बनवले याविषयी माहिती विचारत असते. पास्ता, पिज्जा आणि चटकदार भेळ तिला खूप आवडते. खास करुन वरणभात खूप आवडत असल्याचे स्पंदनने सांगितले."

Web Title: Spandan Chaturvedi entry in 'Kulfikumar Bajwala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.