‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 14:22 IST2018-04-23T08:52:20+5:302018-04-23T14:22:20+5:30

सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.छम छम करता हैं... या 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील ...

Sonali Bendre again as the testator in the third season of 'India's Best Dramaabaz'! | ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत!

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत!

नालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.छम छम करता हैं... या 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाईलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे.आता ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या  रिअॅलिटी शोच्या तिस-या सिझनमध्ये परिक्षक म्हणून झळकणार आहे.या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये मनोरंजन क्षेत्राला निहार गीते, कार्तिकेय राज,तमन्ना दीपक,कार्तिकेय मालवीय,स्वस्ती नित्या,प्रणीत शर्मा यांच्यासारखे काही गुणी कलाकार दिले असून त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता आपल्या तिस-या सिझनद्वारे प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाबरोबरच भावी सुपरस्टार होण्यासाठी गुणी होतकरू कलाकारांच्या अभिनयकौशल्याचे संवर्धन करण्याचा ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ कार्यक्रमाचा हेतू असेल.नामवंत हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षकाच्या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा या कार्यक्रमात परतत असून ती यातील स्पर्धकांना अभिनयातील काही खास टीप्सही देणार आहे.या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहण्याच्या शक्यतेमुळे उत्साहित झालेल्या सोनालीने सांगितले,‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमाशी पहिल्यापासून मी निगडित झाले असून त्याच्या नव्या आवृत्तीची घोषणा झाल्यावर मला पुन्हा एकदा स्वगृही आल्यासारखं वाटतं.देशातील लहान मुलांमध्ये दडलेल्या अभिनयगुणांचा शोध घेऊन त्यांना प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं महत्त्वाचं काम हा कार्यक्रम करतो.या कार्यक्रमातील सहभागामुळे या मुलांना जगाला सामोरं जाण्याचा सराव होत असल्याने त्यांच्या भावी कारकीर्दीची पार्श्वभूमी तो तयार करतो.”सोनाली म्हणाली, “मी आई झाले, त्याच्या आधीपासूनच मला लहान मुलं फार आवडायची. सध्याच्या इच्छुक मुलांमध्ये फारच उत्तम अभिनयगुण असून ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमात त्यांच्या या गुणांना पूर्म वाव मिळताना पाहून मला खूप आनंद होतो.त्यांचा उत्साह काही औरच असतो आणि आपल्या कामाबद्दल त्यांची समर्पित वृत्ती आणि प्रामाणिकपणा पाहून मलाही प्रेरणा मिळते.”

बॉलिवूड अभिनेत्रींचे लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी चॅनलचे निर्माते अभिनेत्रींना जजच्या भूमिकेची ऑफर देतात.यासाठी अभिनेत्रींना चांगले मानधनही दिले जाते.रविनापूर्वी माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी यांनी टेलिव्हिजने शोमध्ये काम करताना प्रत्येक भागाकरिता १ कोटी रुपये आकारले होते.टेलिव्हिजनवर काम करणा-या बॉलीवूडमधील अभिनेत्रींना मिळणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम ठरली होती.  





Web Title: Sonali Bendre again as the testator in the third season of 'India's Best Dramaabaz'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.