दार्जिलिंगमधील 2 अंश थंडीत सोनाक्षी सावे गारठली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 11:54 IST2018-05-22T06:24:12+5:302018-05-22T11:54:12+5:30

काही विशिष्ट कारणास्तव आपली आई आरती (अरिना डे) हिच्यापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये जावे लागणा-या मुस्कान या सात वर्षांच्या मुलीची ...

Sonakshi was reduced to 2 degrees cold in Darjeeling! | दार्जिलिंगमधील 2 अंश थंडीत सोनाक्षी सावे गारठली!

दार्जिलिंगमधील 2 अंश थंडीत सोनाक्षी सावे गारठली!

ही विशिष्ट कारणास्तव आपली आई आरती (अरिना डे) हिच्यापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये जावे लागणा-या मुस्कान या सात वर्षांच्या मुलीची कथा ‘मुस्कान’ या आगामी मालिकेत सादर करण्यात आली असून त्यात मुस्कानची व्यक्तिरेखा सोनाक्षी सावे ही बालकलाकार साकार करणार आहे. ‘स्टार भारत’वरील या आगामी मालिकेच्या काही प्रसंगांचे चित्रीकरण दार्जिलिंग आणि कोलकाता येथील स्थळांवर प्रत्यक्ष जाऊन करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर शाहरूख खानच्या ‘मैं हूँ ना!’ या चित्रपटात दार्जिलिंगमधील ज्या सेंट पॉल स्कूल या बोर्डिंग स्कूलमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते,त्याच बोर्डिंग स्कूलमध्ये या मालिकेसाठीही चित्रीकरण करण्यात आले आहे.

या मालिकेच्या काही भागांसाठी जेव्हा सोनाक्षी आणि अरिना हे दार्जिलिंगमध्ये 10 दिवस चित्रीकरण करीत होते, तेव्हा तेथील तापमान तब्बल दोन अंशांवर घसरले होते. तापमानातील या तीव्र बदलामुळे सात वर्षांची सोनाक्षी तिथे आजारी पडली, असे आमच्या सूत्रांनी आम्हाला सांगितले आहे. तिला औषधे द्यावी लागली आणि चित्रीकरण करताना तिला चार थर असलेले कपडे अंगावर चढवावे लागले होते. थंडीमुळे चित्रीकरण थांबविण्याची शक्यता अजिबातच नव्हती; कारण हे युनिट तिथे केवळ 10 दिवसच राहणार होते आणि त्या काळात त्यांना मालिकेतील बोर्डिंग स्कूलमधील सर्व भागांचे चित्रीकरण करणे आवश्यक होते.निर्मात्यांनी व त्यांच्या मदतनीसांनी सोनाक्षीला थंडीपासून संरक्षण देण्याची सर्व सोय उपलब्ध करून दिली असली,तरी लहानग्या सोनाक्षीला काहीशी अडचण जाणवत होतीच. सूत्रांनी सांगितले की तेथील लोकेशन हे फारच सुरेख होते आणि बोर्डिंग स्कूलमध्ये सोनाक्षीला चित्रीकरण करणे खूप आवडत होते. गोठविणार्‍या थंडीमुळे तिला थोडा त्रास झाला, तरी निर्मात्यांनी तिची सर्वतोपरी काळजी घेतली होती.

‘मुस्कान’ मालिकेत  टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली लविना टंडन ही या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती सुझानची भूमिका रंगविणार आहे. या भूमिकेतील लविनाचे रूप इतके भिन्न असेल, की लविनाला प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच अशा रूपात पाहिलेली नाही. मालिकेत आरिना डे ही बंगाली अभिनेत्री मुस्कानची आई आरतीची भूमिका उभी करणार असून सात वर्षांच्या मुस्कानची भूमिका सोनाक्षी सावे साकारणार आहे.लविनाच्या सुझानच्या व्यक्तिरेखेचा तपशील अजून गुलदस्त्यांत असला, तरी तिची भूमिका कशी आकार घेईल, हे पाहणे रंजक ठरेल. ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ने या मालिकेची निर्मिती केली असून दिलीपकुमार हे तिचे दिग्दर्शक आहेत. रिचा सोनी, अनामिका तिवारी आणि अभिजित लाहिरी हे सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

Web Title: Sonakshi was reduced to 2 degrees cold in Darjeeling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.