सोहा अली खान आणि कुणाल कपूर म्हणतात “बी काईंड टू ऑल काईंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 11:02 AM2018-06-14T11:02:06+5:302018-06-14T16:32:06+5:30

एनिमल प्लॅनेट आणि डिजिटल प्रकारचा सर्वांत मोठा एनिमल ब्रँड असलेल्या डोडो हे ‘डोडो हिरोज’ ह्या एका नवीन मालिकेला प्रस्तुत ...

Soha Ali Khan and Kunal Kapoor say "B Key to do All Kind | सोहा अली खान आणि कुणाल कपूर म्हणतात “बी काईंड टू ऑल काईंड

सोहा अली खान आणि कुणाल कपूर म्हणतात “बी काईंड टू ऑल काईंड

googlenewsNext
िमल प्लॅनेट आणि डिजिटल प्रकारचा सर्वांत मोठा एनिमल ब्रँड असलेल्या डोडो हे ‘डोडो हिरोज’ ह्या एका नवीन मालिकेला प्रस्तुत करतील ज्यामध्ये जगभरातील गरजेच्या स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या व प्राण्यांना मदत करण्यासाठी काहीही करणा-या दयाळु माणसांच्या आशादायक व प्रेरणादायी कथा बघायला मिळतील. प्राण्यांच्या मदतीसाठी काहीही करायला तयार असलेल्या लोकांची एक थरारक व प्रेरणादायी कथा प्रत्येक एपिसोडमध्ये दाखवली जाईल व ह्या मालिकेमध्ये मानव व प्राणी ह्या दोघांच्याही व्यक्तिमत्वांना आणि भावनांना समोर ठेवले जाईल व त्यांच्यामध्ये असलेला भावनिक बंध उलगडला जाईल. डोडो हिरोज ही‌ एनिमल प्लॅनेटची पहिली जागतिक मालिका आहे व तिची सुरुवात शुक्रवार, 15 जून रोजी रात्री 9 वाजता एकाच वेळी भारत व जगातील 220 देश व प्रदेशामध्ये होईल.

भारतामध्ये, रस्त्यावरील प्राण्यांच्या कल्याणासाठी वाहिलेल्या निवडक एनजीओजना सहाय्य करण्यासाठी एनिमल प्लॅनेट ‘बी काईंड टू ऑल काईंड (सर्वांप्रती दयाळु व्हावे)’ हे अभियान सुरू करत आहे. ह्या चॅनलने ह्या संवेदनशील मुद्द्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी सोहा अली खान आणि कुणाल कपूर ह्या सेलिब्रिटीजना त्यात सहभागी केले आहे.

“भारतामधील रस्त्यावरील प्राण्यांची स्थिती चिंताजनक आहे आणि ह्या सुंदर प्राण्यांच्या मदतीसाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. रस्त्यावरील प्राण्यांना मदत करावीशी वाटते, पण करू शकत नाहीत, कारण त्यांना कसे ते माहिती नाही, अशा अनेक लोकांना मी व्यक्तिश: भेटले आहे. ‘बी काईंड टू ऑल काईंड’ मोहीमेमध्ये लोकांना सहभागी करून घ्यायचे आहे व जे काम त्यांना करावेसे वाटते, ते त्यांना करण्यासाठी मदत करायची आहे,” असे सोहा अली खान हिने म्हंटले.  “आश्चर्याची गोष्ट म्हणजे भावना व्यक्त करण्याच्या व संवादाच्या बाबतीत प्राणी हेही मानवांसारखेच असतात. किंबहुना मी माझ्या कुत्र्यांना (3 कुत्रे) जास्त लाडवत नाही, तर तेच त्यांच्या निस्वार्थ प्रेमाने मला लाडवतात. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी आनंदाचा असतो. ईश्वराच्या सर्वांत लोभस निर्मितीचा भाग असलेल्या प्राण्यांसोबत ‘नैसर्गिक’ भावनेने राहून आपल्याला जे समाधान मिळतं, ते आश्चर्यकारक आहे.”

कुणाल कपूर ह्याने म्हंटले, “सर्व जैव प्रजाती, विशेषत: प्राण्यांसाठी उभे राहणे, ही आपली जवाबदारी आहे. आपण परिस्थितीची गरज असते, तेव्हा दुसरा विचार करूच शकत नाही. किंबहुना आपल्याला निर्णायक कृती करण्याची गरज आहे. गरजू प्राण्यांचा बचाव, पुनर्वसन करून त्यांना आसरा देणारे, प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सेवा चालवणारे, नसबंदी कार्यक्रम, उपचार शिबिर आणि आपत्ती बचाव अभियान राबवणा-या एनजीओज आहेत. जर आपण व्यक्तीश: जाऊन त्या प्राण्यांना मदत करू शकत नसू, तर आपण प्राणी कल्याणाचे कार्य करणा-या एनजीओजना तरी मदत करू शकतो. ह्या महत्त्वाच्या कामामध्ये अधिकाधिक जण सहभागी होतील आणि भारताला सर्व प्राण्यांसाठी जगण्याचे अधिक चांगले स्थान बनवतील, अशी मला आशा आहे.” 


बी काईंड टू ऑल काईंडचा भाग म्हणून, ‘वर्ल्ड फॉर ऑल’ सहित एनजीओजना लोकांनी थेट मदत करावी, ह्यासाठी एनिमल प्लॅनेट लोकांना आवाहन करत आहे जेणेकरून ही संस्था रस्त्यावरील गरजू प्राण्यांना प्रथमोपचार देऊ शकेल, त्यांचा मासिक बचाव व प्रक्रिया कार्यक्रम राबवू शकेल. ‘द फेलाईन फाउंडेशन’ मुंबईतील रस्त्यावरील मांजरी व कुत्र्यांच्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते व ‘वाईल्ड लाईफ रिस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ बंधनातील जीवनातून सोडवून आणलेल्या पाच हत्तीना पोषण देते व देखभाल देते.  www.animalplanet.in वर भेट द्या आणि मदतीचा हात द्या.

Web Title: Soha Ali Khan and Kunal Kapoor say "B Key to do All Kind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.