मराठी नव्हे तर हिंदी मालिकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते असे सांगतेय स्नेहा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 19:13 IST2017-03-21T13:43:14+5:302017-03-21T19:13:14+5:30

स्नेहा वाघने अधुरी एक कहानी या मराठी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये ...

Sneha Wagh says that Marathi is not Marathi but it can reach more people because of her | मराठी नव्हे तर हिंदी मालिकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते असे सांगतेय स्नेहा वाघ

मराठी नव्हे तर हिंदी मालिकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते असे सांगतेय स्नेहा वाघ

नेहा वाघने अधुरी एक कहानी या मराठी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. वीर की अर्दास... वीरा या हिंदी मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. आता ती शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या मालिकेत काम करत आहे. या मालिकेबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या मालिकेतील तुझ्या भूमिकेसाठी तू कशाप्रकारे तयारी केलीस?
मी या मालिकेत रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका साकारत आहे. त्यांच्याविषयी इतिहासात खूपच कमी माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती गोळा करून मी अभ्यास करणे शक्य नव्हते. पण यासाठी माझ्या मालिकेच्या टीमने मला खूप मदत केली. त्यांनी मला या भूमिकेतील प्रत्येक बारकावे समजून सांगितले. तसेच चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व कलाकारांचे अनेक वर्कशॉप घेण्यात आले होते. त्यात आम्हाला आमच्या व्यक्तिरेखांविषयी प्रत्येक गोष्ट सांगण्यात आली होती. 

स्नेहा तू तुझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऐतिहासिक मालिकेत काम करत आहेस, ऐतिहासिक मालिकेत काम करणे हे इतर मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा वेगळे असते असे तुला वाटते का?
मी आतापर्यंत कधीच ऐतिहासिक मालिकेत काम केले नव्हते. ऐतिहासिक मालिकेत काम करत असताना तुमची वेशभूषा, रंगभूषा तर बदलते. पण त्याचसोबत तुम्हाला तुमची देहबोलीदेखील बदलावी लागते. या मालिकांमध्ये अभिनयदेखील थोडा वेगळा करावा लागतो. तुम्ही इतर मालिकांमध्ये करता तसा अभिनय यात करता येत नाही. तसेच संवादफेक ही वेगळ्या पद्धतीने करावी लागते. त्यामुळे इतर मालिकांमध्ये काम करणे आणि ऐतिहासिक मालिकेत काम करणे यात खूपच फरक आहे. 

ऐतिहासिक मालिकेतली भाषा खूप वेगळी असते. त्यामुळे या मालिकेतील संवादासाठी तुला काही मेहनत घ्यावी लागली का?
या मालिकेत काही संवाद हे पंजाबीत आहेत. पण त्यातही भाषा ही राजेशाही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय शुद्ध शब्द यात वापरण्यात आले आहे. त्यामुळे संवादावर खूप मेहनत घ्यावी लागते. कोणताही उच्चार चुकणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

तू मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केले आहेस, तुला यात काय फरक जाणवतो?
दोन्ही इंडस्ट्रीच्या कामकाजामध्ये मला काहीही फरक जाणवत नाही. पण तुम्ही मराठी मालिका अथवा चित्रपट करत असाल तर तुम्ही केवळ काहीच लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण हिंदी मालिका केल्यानंतर संपूर्ण देशातीलच नव्हे परदेशातील लोकदेखील तुम्हाला ओळखतात. वीर की अर्दास... वीरा ही मालिका भारतात दाखवल्यानंतर इंडोनेशिया, आफ्रिकासारख्या देशात दाखवली गेली. या मालिकेमुळे अनेक परदेशातील लोकदेखील माझे फॅन बनले आहेत. ते मला सोशल नेटवर्किंगवर फॉलो करतात. तसेच त्यांच्या प्रतिक्रिया मला सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पोहोचवत असतात. 

Web Title: Sneha Wagh says that Marathi is not Marathi but it can reach more people because of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.