'भाभीजी घर पर है'विभूती नारायणच्या रिअल फॅमिली फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:23 IST2018-02-21T09:53:31+5:302018-02-21T15:23:31+5:30
'भाभीजी घर पर है' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे.या मालिकेतील प्रत्येक पात्र गेल्या दशकभरापासून रसिकांचं मनोरंजन करत आहे.मुळात ...

'भाभीजी घर पर है'विभूती नारायणच्या रिअल फॅमिली फोटो!
' ;भाभीजी घर पर है' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे.या मालिकेतील प्रत्येक पात्र गेल्या दशकभरापासून रसिकांचं मनोरंजन करत आहे.मुळात या मालिकेतील सगळेच कलाकार आज लोकप्रिय आहेत.त्यामुळे प्रत्येक कलाकाराविषयी त्यांचे रिअल लाईफ गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते.आज घराघरात 'भाभीजी घर पर है' मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा जणू काही प्रत्येक घरातील सदस्यच बनली आहेत. प्रत्येक व्यक्तीरेखेची खास बात आहे.त्यामुळे ही पात्रं गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली आहेत.यातील एक प्रमुख पात्र म्हणजे विभूती नारायण.मालिकेत विभूती नारायण मिश्राचा रोल साकरणारा आसिफ शेख रियल लाइफमध्ये 25 वर्षांच्या मुलीचा आणि 22 वर्षांच्या मुलाचा पिता आहे.आसिफच्या पत्नीचे नाव जेबा असून मुलगी मरयम आणि मुलाचे नाव अलीजाह आहे.आसिफ शेख म्हणाले, लग्नाला 25 वर्षे होऊन गेली आहेत.माझी पत्नी जेबा हाऊसवाइफ आहे.आसिफचे म्हणणे आहे की त्याची मुलगी आणि मुलगा यांना अॅक्टिंगमध्ये जराही रस नाही. मरयम एका टॅलेंट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते. तर मुलगा अलीजाहने इराणी डायरेक्टर माजिद मजीदीसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.विभूती नारायण भूमिकेने आसिफला फक्त लोकप्रियताच मिळवून दिली नाही तर आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवले आहे.आसिफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने छोट्या पडद्यावर आज त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. आसिफने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करून आज अनेक वर्षं झाली आहेत. हम लोग या प्रसिद्ध मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो मेहेंदी तेरे नाम की, यस बॉस यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकला. आजवर त्याच्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक झाले आहे. याचसोबत तो अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने पहेली, जोडी नं १, कुवारा, बंधन, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.