'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:53 PM2021-07-27T14:53:58+5:302021-07-27T14:59:43+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत सध्या कभी खुशी कभी गम असेच पाहायला मिळत आहे.नलू मावीशी ओमच्या कामामुळे इम्प्रेस होत असताना दुसरीडकडे ​स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत.

Shocking Twist In Yeu Kashi Tashi Me Nandayala Serial, what will be reaction of Malvika when see comes to know Mohit is reason Behind Chinyas accident | 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

googlenewsNext

दिवसेंदिवस 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत रंजक वळण पाहायला मिळत आहे.'येऊ कशी तशी मी नांदायला' ही लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. स्वीटूसोबत लग्न करायचे असेल तर मिळेल ते काम करत काबाड कष्ट करत दोन पैसे कमवावे लागतील अशी अट नलू मावशीने ओम घातली होती. ओमनेही भाजी विकत मोठ्या मेहनतीने अट पूर्ण केली आहे. त्यामुळे स्वीटूही प्रचंड आनंदित आहे.

सध्या मालिकेत आनंदाचा माहोल पाहायला मिळत आहे. चिन्यालाही आता नोकरी मिळालीय, तर दुसरीकडे ओमनेही नलू मावशीचं मनं जिंकलं आहे. मात्र मालिकेत सध्या कभी खुशी कभी गम असेच पाहायला मिळत आहे.नलू मावीशी ओमच्या कामामुळे इम्प्रेस होत असताना दुसरीडकडे   ​स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.


मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतोय पण काही केल्या ओम हार मानत नाही आहे हे बघितल्यावर मोहितच्या डोक्यात आता नवीन डाव शिजतोय. चिन्याला नोकरी लागल्यामुळे घरी सगळे खुश आहेत आणि त्याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मोहित त्याचा अपघात घडवून आणतो.

 

हे कळल्यावर स्वीटू आणि ओम तातडीने चिन्याकडे जातात आणि ओमच्या सांगण्यावरून चिन्यावर उपचार देखील सुरु होतात पण मालविका हिला कळतं कि हा अपघात घडवून आणण्यामागे मोहितचा हात आहे. अशावेळी मालविका साळवी कुटुंबाची साथ देईल? कि मोहितच्या चुकीवर पडदा टाकेल? मालविकाचा स्टॅन्ड काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Web Title: Shocking Twist In Yeu Kashi Tashi Me Nandayala Serial, what will be reaction of Malvika when see comes to know Mohit is reason Behind Chinyas accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.