रात्री सिद्धार्थच्या जवळच होती शहनाज गिल?; सकाळी उठून पाहते तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 10:35 AM2021-09-03T10:35:02+5:302021-09-03T11:25:31+5:30

Sidharth Shukla Death : सिद्धार्थच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिल हिची अवस्था तर बघवत नाही. ती काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही...

Shehnaaz Gill Was Reportedly By Sidharth Shukla Side He Slept On Her Lap And Passed Away | रात्री सिद्धार्थच्या जवळच होती शहनाज गिल?; सकाळी उठून पाहते तर...

रात्री सिद्धार्थच्या जवळच होती शहनाज गिल?; सकाळी उठून पाहते तर...

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धार्थ व शहनाज दोघेही एकमेकांच्या खूप क्लोज होते. बिग बॉस 13 या शोमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. चाहत्यांनाही ही जोडी प्रचंड आवडली होती. चाहत्यांनीच या जोडीला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla)अकाली निधनाने (Sidharth Shukla Death ) सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. काल 2 सप्टेंबरला सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थ या जगात नाही,अद्यापही यावर विश्वास बसत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिल (Shehnaaz Gill ) हिची अवस्था तर बघवत नाही. ती काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. तूर्तास सिद्धार्थ व शहनाज यांच्याबद्दल एक नवी माहिती समोर येतेय. होय, सिद्धार्थच्या मृत्यूवेळी शहनाज त्याच्याजवळ होती आणि तिच्या डोळ्यादेखत सिडने प्राण सोडला, असे म्हटले जातेय.

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री 9.30 वाजता सिद्धार्थ घरी आला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी त्याच्या घरी त्याची आई व शहनाज दोघीही हजर होत्या. आधी त्यांनी सिद्धार्थना नींबू शरबत दिले आणि नंतर आईसक्रीम खायला दिली. जेणेकरून सिद्धार्थला थोडे बरे वाटावे. पण सिद्धार्थची अस्वस्थता वाढत गेली. त्याला पुन्हा छातीत दुखू लागले. शहनाज व त्याच्या आईने त्याला विश्रांती करायचा सल्ला दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला झोपू शकला नाही. त्याने शहनाज त्याच्या जवळ राहून पाठ थोपटायला सांगितली. रात्री 1.30 च्या सुमारास सिद्धार्थ शहनाजच्या कुशीतच झोपला. शहनाजचाही डोळा लागला होता. सकाळी 7 वाजता शहनाजची झोप उघडली तेव्हा सिद्धार्थ रात्रभर एकाच पोझिशनमध्ये असल्याचे आणि तो काहीही हालचाल करत नसल्याचे तिला जाणवले. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. ती घाबरली आणि ओरडत 15 व्या माळ्यावर 5 व्या माळ्यावर आली. जिथे त्याची फॅमिली राहत होती. सिद्धार्थची बहिण धावत वर आली.  त्यांनी फॅमिली डॉक्टरला बोलवले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सिद्धार्थ व शहनाज दोघेही एकमेकांच्या खूप क्लोज होते. बिग बॉस 13 या शोमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. चाहत्यांनाही ही जोडी प्रचंड आवडली होती. चाहत्यांनीच या जोडीला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

Web Title: Shehnaaz Gill Was Reportedly By Sidharth Shukla Side He Slept On Her Lap And Passed Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.