शाल्व किंजवडेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'शिवा' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:34 AM2024-01-30T11:34:01+5:302024-01-30T11:34:29+5:30

Shalva Kinjawadekar : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला शाल्व किंजवडेकरचे पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे.

Shalva Kinjwadekar's comeback on small screen, will be seen in 'Shiva' serial | शाल्व किंजवडेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'शिवा' मालिकेत

शाल्व किंजवडेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'शिवा' मालिकेत

'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayala) मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. अन्विता फलटणकर (Anvita Phalatankar) आणि शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होते. या मालिकेनंतर शाल्व कोणत्या मालिकेत पाहायला मिळाला नाही. दरम्यान आता तो छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. तो 'शिवा' या मालिकेतून पुनरागमन करत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला शाल्व किंजवडेकर पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. आता शाल्व 'शिवा' या मालिकेत दिसणार आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालेल.

शिवा मालिकेबद्दल
शिवा म्हणजे शिवानी पाटील ! संघर्षनगर नावच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय, कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे. शिवाच्या घरी आहेत तिची मोठी बहीण दिव्या, तिची आई आणि तिची आज्जी ! वडिलांचं अकाली निधन झाल्याने या सगळ्यांची जबाबदारी शिवावर आहे, दिव्याचा स्वभाव शिवापेक्षा अतिशय वेगळाय, याच दिव्याचा फोटो बघून तिच्या प्रेमात पडतो तो आशु, आशुतोष देसाई ! कोट्याधीश आणि अतिशय संस्कारी कुटुंबातील मुलगा ! आशु आणि शिवाच स्वभाव एकदम विरुद्ध ! पण त्यांच्यात नकळत मैत्रीचं नात तयार होते, अशा या बिनधास्त आणि बेधडक शिवाला ती जशी आहे तशी हा समाज स्वीकारू शकेल का ?

जगदंब क्रिएशन ने ह्या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे अभयसिह जाधव यांनी तर संवाद लेखक प्रह्लाद कुडतरकर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत स्वप्नील वारके. यात बिनधास्त शिवाची भूमिका साकारणार आहे पूर्वा कौशिक. तिच्या सोबत शाल्व किंजवडेकर, समीर पाटील, मीरा वेलणकर आणि सविता मालपेकर हे कलाकार दिसणार आहेत. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता भेटीला येईल.    
 

Web Title: Shalva Kinjwadekar's comeback on small screen, will be seen in 'Shiva' serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.