​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेचे थायलंडमध्ये होणार चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 15:09 IST2017-07-22T09:39:55+5:302017-07-22T15:09:55+5:30

शक्ती... अस्तित्व के एहसास की ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. या ...

Shakti ... realization that the series will be shot in Thailand | ​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेचे थायलंडमध्ये होणार चित्रीकरण

​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेचे थायलंडमध्ये होणार चित्रीकरण

्ती... अस्तित्व के एहसास की ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेद्वारे तृतीतपंथीयांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या मालिकेचे अधिकाधिक चित्रीकरण हे मुंबईतच होते. पण लवकरच या मालिकेचे चित्रीकरण दुसऱ्या देशात होणार आहे.
मालिकेच्या चित्रीकरणासाठी टीम थायलंडला रवाना होणार आहे. या मालिकेच्या कथानकाला आता खूप चांगले वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारे सौम्या म्हणजेच रुबिना दिलाइक आणि हरमन म्हणजेच विवियन डिसेना थायलंडमध्ये गेले असल्याचे दाखवले जाणार आहे. त्यामुळे बँकॉक, पट्टाया आणि थायलंडमधील अनेक निसर्गरम्य ठिकाणी या मालिकेचे चित्रीकरण केले जाणार आहे. रुबिना आणि विवियन बँकॉकमध्ये चित्रीकरण करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याविषयी रुबिना सांगते, मला स्वतःला फिरायला खूप आवडते. फिरणे हे माझे पहिले प्रेम आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थायलंडमध्ये होणार हे मला कळल्यावर मी खूपच खूश झाले होते. मी आधीही थायलंडला अनेकवेळा फिरायला गेले आहे. त्यामुळे तेथील अनेक ठिकाणं मला माहिती आहेत. त्यामुळे चित्रीकरणातून वेळ काढून मी थायलंडदेखील फिरण्याचा विचार केला आहे. आता या मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार असून सौम्याच्या जीवनातील आणखी एक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
सौम्या हरमनपासून दूर जाण्यासाठी बँकॉकमध्ये नोकरी करण्याचे ठरवणार आहे आणि नॅनी म्हणून तेथील एका घरात काम करणार आहे तर सौम्याला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी हरमनसुद्धा बँकॉकला जाणार आहे. 

Also Read : रुबिना दिलाइक बालीमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय
 

Web Title: Shakti ... realization that the series will be shot in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.