​पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेत साहिल सलाथीय दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 12:29 IST2017-01-17T12:29:52+5:302017-01-17T12:29:52+5:30

एव्हरेस्ट या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला साहिल सलाथीय पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेत लवकरच झळकणार आहे. एव्हरेस्ट ...

In this series of PoW - Banned War, Sahil Salathani looks villainous | ​पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेत साहिल सलाथीय दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

​पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेत साहिल सलाथीय दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

्हरेस्ट या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला साहिल सलाथीय पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेत लवकरच झळकणार आहे. एव्हरेस्ट ही मालिका प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची होती तर पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेचे दिग्दर्शन निखिल अडवाणी करत आहे. 
पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. मालिकेत आता युद्धकैद्यांच्या देशभक्तीवर संशय घेतला जाणार आहे आणि त्यामुळे मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे.
पाकिस्तानी दहशतवादी युसुफ अली मुअझ्झनच्या भूमिकेत प्रेक्षकांना साहिल सलाथीयला पाहायला मिळणार आहे. 
मालिकेत युसुफच्या व्यक्तिरेखेमुळे कथानकात खूप बदल घडणार आहेत. त्याच्या एंट्रीनंतर सरताज म्हणजेच पूरब कोहली आणि इमान खान म्हणजेच सत्यदीप मिश्राच्या आयुष्यात अनेक नव्या समस्या निर्माण होणार आहेत. युसुफ हा कट कारस्थानांचा प्रमुख सूत्रधार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत छोट्या पडद्यावर दाखवल्या गेलेल्या खलनायकांपेक्षा हा खूपच वेगळा असणार आहे. निखिल अडवाणी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे साहिल सांगतो. पीओडब्ल्यू - बंदी युद्ध के या मालिकेचा विषय खूप वेगळा असल्याने साहिल या कार्यक्रमाचा भाग होण्यास खूप उत्सुक होता. या कार्यक्रमाविषयी साहिल सांगतो, "निखिल आडवाणी यांच्या कार्यपद्धतीचा मी मोठा चाहता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा येत आहे. माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे."


Web Title: In this series of PoW - Banned War, Sahil Salathani looks villainous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.