सूरभि चंदना म्हणते, माझी भूमिका मला देत असलेली आव्हानं मला आवडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 09:46 IST2018-02-21T09:21:59+5:302018-02-22T09:46:57+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ या मालिकेच्या प्रसारणाला प्रारंभ झाल्यापासूनच या मालिकेने प्रेक्षकांमध्ये पसंतीचे स्थान पटकाविले होते. या मालिकेत अन्निकाची भूमिका साकारणार्‍या ...

Saurabh Chandana says, "I like the challenge given to me by my role | सूरभि चंदना म्हणते, माझी भूमिका मला देत असलेली आव्हानं मला आवडतात

सूरभि चंदना म्हणते, माझी भूमिका मला देत असलेली आव्हानं मला आवडतात

्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ या मालिकेच्या प्रसारणाला प्रारंभ झाल्यापासूनच या मालिकेने प्रेक्षकांमध्ये पसंतीचे स्थान पटकाविले होते. या मालिकेत अन्निकाची भूमिका साकारणार्‍या सूरभि चंदना या अभिनेत्रीने आपल्या अभिनयकौशल्यामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळविली आहे. मात्र सूरभिच्या या व्यक्तिरेखेने आता 360 अंशांत वळण घेतले असून तिचा स्वभावच नव्हे, तर तिचा सारा लूकही पूर्णपणे बदलून गेला आहे. सूरभि आता कुमारी रोझी राणी बनून ओबेरॉय हाऊसमध्ये एका मोहिमेवर आली आहे. ओबेरॉय कुटुंबीय सध्या अन्निकाच्या मृत्यूच्या दु:खात बुडाले असले, तरी कुमारी रोझी राणीच्या रूपात त्यांच्या वनाला एक नवी कलाटणी लवकरच मिळणार आहे. परंतु रोझी राणीच्या विचित्र स्वभावामुळे ती सध्या प्रेक्षकांसाठी एक विनोदी पात्र बनली आहे. आपल्या याच बदललेल्या भूमिकेबद्दल सूरभि म्हणाली, “विनोदाचं अचूक टायमिंग साधणं हे कोणत्याही कलाकारापुढे एक आव्हान असतं. ही मालिका आणि त्यातली माझी भूमिका मला जी नवनवी आव्हानं देत आहे, ती मला आवडतात. रोजच्या रोज स्वत:तील कलाकाराला आव्हान देत राहायचं आणि आदल्या दिवशीपेक्षा आज अधिक चांगला अभिनय करायचा, ही गोष्ट स्वीकारायला मला मजा येत आहे. या नव्या भूमिकेचा स्वभाव आणि वर्तणूकही अगदी विचित्र आहे. तिचं दिसणं तर त्याहूनही विक्षिप्त आहे. पण त्यामुळेच तर मला ही भूमिका साकारताना खूप मजा येत आहे.” 

मालिकेतील  शिवायसिंह ओबेरॉय (नकुल मेहता) आणि अन्निका (सूरभि चंदना) या जोडप्यातील प्रेम आणि सामंजस्याचे नाते हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. या मालिकेच्या विद्यमान कथाभागाला लवकरच एक जबरदस्त वळण लागणार आहे. शिवायसिंहला आपली पत्नी अन्निकाची गोळी मारून हत्या करतो, असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण इथे त्यांच्या प्रेमकथेचा अंत होत नाही; कारण आमच्या असे कानावर आले आहे की प्रेक्षकांना यापुढचा धक्का देण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. तो म्हणजे, सूरभि चंदनाला लवकरच दुहेरी भूमिकेत सादर केले जाणार आहे. दुहेरी भूमिकेत सूरभि अन्निकाचीच भूमिका साकारणार असून तिच्यासारखी दिसणारी दुसरी अन्निका ही मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच भिन्न असेल

Web Title: Saurabh Chandana says, "I like the challenge given to me by my role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.