द व्हॉइज इंडियासाठी सलीम मर्चंटने मागितली सुलेमान मर्चंटची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:20 IST2017-01-13T17:20:39+5:302017-01-13T17:20:39+5:30
द व्हॉइज इंडिया या कार्यक्रमाची सध्या चांगलीच धुम सुरू आहे. या कार्यक्रमात निती मोहन, सलीम मर्चंट, बेनी डायल हे ...

द व्हॉइज इंडियासाठी सलीम मर्चंटने मागितली सुलेमान मर्चंटची मदत
द व्हॉइज इंडिया या कार्यक्रमाची सध्या चांगलीच धुम सुरू आहे. या कार्यक्रमात निती मोहन, सलीम मर्चंट, बेनी डायल हे परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक परखजीतने गायलेले इक कुडी हे गाणे सगळ्यांनाच खूप आवडले होते. तर शरयूने गायलेले मला जाऊ द्या ना घरी हे मराठी गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता या स्पर्धेत लवकरच ब्लाइंड ऑ़डिशन होणार आहेत. या ऑडिशनसाठी स्पर्धकांची जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धकांची तयारी चांगली व्हावी यासाठी सलीम प्रचंड मेहनत घेत आहे. तसेच स्पर्धक कुठेही कमी पडू नयेत यासाठी तो सगळे प्रयत्न घेत आहे आणि आता त्याने या ऑडिशनच्या तयारीसाठी त्याचा संगीत जगतातील जोडीदार आणि भाऊ सुलेमानचीही मदत घेण्याचे ठरवले आहे. सुलेमानलाही या स्पर्धकांचे आवाज आवडत असल्याने त्यानेदेखील या स्पर्धकांना मदत करण्यासाठी लगेचच होकार दिला आहे. याविषयी सलीम मर्चंट सांगतो, "मी आणि माझा भाऊ सलीम हे संगीतात एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. त्यामुळे द व्हाईज इंडिया या कार्यक्रमातील स्पर्धकांना सुलेमानने भेटावे अशी माझी इच्छा आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक परखजीत आणि शरयू या दोघांचाही आवाज खूपच चांगला आहे. मायक्रोफोनवर तर तो अतिशय मृदू वाटतो. हे दोघेही माझे खूप लाडके आहेत. पण या ऑडिशननंतर दोघांपैकी कोणतरी एक मला सोडून जाणार आहे याचे मला खूपच दुःख होत आहे."