​सई देवधर आणि शक्ती आनंदची सावधान इंडियासाठी जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 16:27 IST2017-07-06T10:57:57+5:302017-07-06T16:27:57+5:30

सई देवधर आणि शक्ती आनंद यांनी सारा आकाश या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांची जोडी खूप गाजली ...

Sai Deodhar and Shakti Anand will be careful about the partnership between India and India | ​सई देवधर आणि शक्ती आनंदची सावधान इंडियासाठी जमली जोडी

​सई देवधर आणि शक्ती आनंदची सावधान इंडियासाठी जमली जोडी

देवधर आणि शक्ती आनंद यांनी सारा आकाश या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांची जोडी खूप गाजली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांचे सूत जमले आणि त्या दोघांनी काही वर्षांनी लग्न केले. त्यानंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक लडकी अनजानी सी या मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यांच्या लग्नाला आता काही वर्षं झाली आहेत. लग्नानंतर सईने काम करणे खूपच कमी केले आहे. दिल की बाते दिल ही जाने या कार्यक्रमात ती अनेक वर्षांनंतर झळकली होती. सई आणि शक्ती यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांची ही क्यूट जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 
लाइफ ओके या वाहिनीवरील सावधान इंडिया ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेच्या एका भागात आता सई आणि शक्ती प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत. शक्तीसोबत पुन्हा काम करायला मिळत असल्याने सई सध्या खूप खूश आहे. ती सांगते, मी 2007मध्ये शक्ती सोबत काम केले होते. त्यानंतर काही जाहिराती आणि चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र झळकलो होतो. पण त्याच्यासोबत काम करण्याची मला जास्त संधी मिळाली नाही. नवऱ्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. पण सावधान इंडिया या मालिकेचे चित्रीकरण दिल्लीत असल्याने मी सुरुवातीला द्विधा मनस्थितीत अडकले होते. कारण माझी मुलगी लहान असल्याने मला आऊटडोर शुटिंग करणे शक्य नव्हते. पण माझ्या आईने मला सांगितले की ती मुलीला सांभाळेल आणि त्यामुळे मी हे चित्रीकरण करू शकले. या चित्रीकरणाच्या दरम्यान आम्हाला एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवता आला. तसेच यामुळे आमच्या नात्यात एक ताजेपणा आला असल्याचे मला वाटते.
सावधान इंडियामध्ये सई आणि शक्ती नवरा बायकोच्या भूमिकेत आहेत. पण यात शक्तीची भूमिका खलनायकाची आहे. आमच्या नात्यात अतिशय भांडणे दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका त्यांच्या मुलीने पाहू नये असे शक्तीला वाटते. 

Web Title: Sai Deodhar and Shakti Anand will be careful about the partnership between India and India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.