साथ निभाना साथिया या मालिकेचे होणार सिंगापूरमध्ये चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 18:09 IST2017-01-28T12:39:31+5:302017-01-28T18:09:31+5:30

मालिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. देख भाई देख या मालिकेने छोट्या पडद्यावर हा ट्रेंड सुरू केला ...

Saathiya will be taking part in the series shooting in Singapore | साथ निभाना साथिया या मालिकेचे होणार सिंगापूरमध्ये चित्रीकरण

साथ निभाना साथिया या मालिकेचे होणार सिंगापूरमध्ये चित्रीकरण

लिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. देख भाई देख या मालिकेने छोट्या पडद्यावर हा ट्रेंड सुरू केला होता. त्यानंतर क्योंकी साँस भी कभी बहू थी, परदेस मैं हे मेरा दिल या मालिकांमधील काही भागांचे चित्रीकरण झाले होते. नुकतेच ये है मोहोब्बते या मालिकेचे अॅडलेड शहारातील ओव्हल या प्रसिद्ध स्टेडियमच्या आणि रुंडल स्ट्रीट मार्टच्या परिसरात चित्रकरण झाले होते. 
आता या सगळ्या मालिकांनंतर साथ निभाना साथिया या मालिकेचे सिंगापूरमध्ये चित्रीकरण होणार असल्याची चर्चा आहे. साथियाच्या कथानकाला पुढील काही भागांमध्ये एक वळण मिळणार असून या महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण परदेशात करण्याचे या मालिकेच्या टीमने ठरवले आहे. या मालिकेचे चित्रीकरण अमेरिका अथवा स्पेनमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण काही गोष्टींमुळे तिथे चित्रीकरण करणे शक्य नसल्याने आता या मालिकेचे चित्रीकरण सिंगापूर येथे होणार असल्याची चर्चा आहे. सिंगापूरमध्ये चित्रीकरण करण्यासाठी मालिकेच्या टीममधील काही कलाकार आणि तंत्रज्ञ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंगापूरला रवाना होणार असल्याची चर्चा आहे. 
देवोलिना भट्टाचार्जी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी गोपी लवकरच तिच्या मुलाच्या समोर येणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती तिच्या मुलाला आता मोदी हाऊसमध्ये परत घेऊन येणार असून त्यामुळे मालिकेच्या कथानकात अनेक बदल होणार आहेत. गोपी आणि तिचा मुलगा सिंगापूरमध्ये समोरासमोर येणार असल्याची चर्चा आहे. 
साथिया या मालिकेत नुकतीच श्रुती प्रकाशची एंट्री झाली आहे. ती गोपीचा मुलगा म्हणजेच रोहित सुचांतीच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Saathiya will be taking part in the series shooting in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.