चंचल बीचवालेची भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी - अनन्या खरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:00 IST2018-09-14T15:44:46+5:302018-09-17T06:00:00+5:30

सोनी सब वाहिनीवरील 'बीचवाले' मालिकेत अभिनेत्री अनन्या खरे चंचल बीचवाले या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

The role of Chanchal Beechwale is much different than the role played so far - Ananya true | चंचल बीचवालेची भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी - अनन्या खरे

चंचल बीचवालेची भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी - अनन्या खरे

ठळक मुद्देअनन्या खरे दिसणार चंचल बीचवालेच्या भूमिकेत 'बीचवाले' मालिका विनोदी असून त्यात ग्रे शेड नाही

सोनी सब वाहिनीवरील 'बीचवाले' मालिकेत अभिनेत्री अनन्या खरे चंचल बीचवाले या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी असल्याचे अनन्याने सांगितले. 

'बीचवाले' या मालिकेतील भूमिकेबद्दल सांगताना अनन्या म्हणाली की, 'यात मी चंचल बीचवालेची भूमिका साकारली आहे. जी बॉबी बीचवालेची पत्नी आहे. ती एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. तिच्या नवऱ्याचे दिल्लीत स्वत:चे गॅरेज आणि मोटर मॅकॅनिक दुकान आहे. चंचल ही खूप आनंदी, प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती आहे. तिला आपल्या कुटुंबीयांसोबत राहायला आवडते आणि ते आनंदी राहावेत असे तिला वाटते. तिच्या मुलांना चांगले शिक्षण आणि नोकऱ्या मिळाव्यात ही तिची सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा आहे. सर्वांनी आनंदी राहावे असे तिला वाटते.'

चंचलची भूमिका ही अलिकडे केलेल्या भूमिकांहून वेगळी असल्यामुळे होकार दिल्याचे अनन्या सांगते. माझ्या काही भूमिका लोकांना आवडल्या, त्याचे त्यांनी खूप कौतुक केले त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक माझ्याकडे खूप ताण असलेल्या, खूप नाट्य असलेल्या भावनांनी थबथबलेल्या नकारात्मक भूमिका घेऊनच येत होते. या भूमिकांहून चंचल बीचवाले खूप वेगळी आहे. ती तिच्या वाट्याला आलेल्या कामाबद्दल आणि कुटुंबाबद्दल खूप आनंदी आहे. तिला फक्त तिच्या कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे आणि ते सगळे यशस्वी ठरताना बघायचे आहे. सर्व मध्यमवर्गीय स्त्रियांप्रमाणे कुटुंबाचा आनंद हा तिच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे, असे ती सांगत होती. पुढे म्हणाली की, ही सोनी सबची मालिका आहे. विनोदी आहे. यात कोणत्याही नकारात्मक भावना किंवा ग्रे शेड नाही. अशा भूमिका मी गेल्या ५-६ वर्षांत केलेल्या नाहीत. त्यामुळे हा माझ्यासाठी ताजेतवाने करणारा अनुभव आहे.
 

Web Title: The role of Chanchal Beechwale is much different than the role played so far - Ananya true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.