रोहन मेहरा सेटवर ‘हा’ सीन करताना झाला गंभीर जखमी; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 21:45 IST2017-08-31T16:15:56+5:302017-08-31T21:45:56+5:30

‘बिग बॉस’ सीजन १० चा स्पर्धक आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम रोहन मेहरा सेटवर एका अपघातात गंभीरपणे ...

Rohan Mehra was seriously injured while working on the set; Read detailed! | रोहन मेहरा सेटवर ‘हा’ सीन करताना झाला गंभीर जखमी; वाचा सविस्तर!

रोहन मेहरा सेटवर ‘हा’ सीन करताना झाला गंभीर जखमी; वाचा सविस्तर!

िग बॉस’ सीजन १० चा स्पर्धक आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम रोहन मेहरा सेटवर एका अपघातात गंभीरपणे जखमी झाला आहे. सूत्रानुसार एक अ‍ॅक्शन सीन करताना ही घटना घडली आहे. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्यानंतर रोहन सध्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करीत आहे. याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्याला हा अपघात झाला आहे. या मालिकेत रोहन निगेटीव्ह भूमिका साकारत आहे. दरम्यान, स्वत:ला बेल्ट मारतानाचा सीन रोहन शूट करीत होता याच दरम्यान तो गंभीरपणे जखमी झाला आहे. 

मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत रोहनने सांगितले की, ‘शूट दरम्यान मला स्वत:ला बेल्टने मारायचे होते. त्याचबरोबर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी भिंतीवर डोकेही आदळायचे होते. त्यानंतर डोक्यातून वाहणाºया रक्ताने मला माझ्या प्रियसीचे नाव लिहायचे होते. असा हा सीन अधिक लाइव्ह व्हावा या प्रयत्नातून मी जखमी झालो. मला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. अशातही मी माझ्या कामाला प्राधान्य देत असून, लवकरच मी पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे,’ असेही रोहनने स्पष्ट केले.  



छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये रोहनने नक्षची भूमिका साकारली होती. त्यामुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला होता. परंतु बिग बॉसच्या घरात प्रवेश करायचा असल्याने त्याला मालिकेला बाय बाय करावा लागला. बिग बॉसच्या घरातही रोहन पॉप्युलर स्पर्धकांपैकी एक होता. तो विजेतेपदाच्या खूपच जवळही आला होता. काही सेलिब्रिटींनी तर रोहनच या भागाचा विजेता असेल, असे भाकितही केले होते. परंतु तसे होऊ शकले नाही. 

दरम्यान, बिग बॉसच्या घरात त्याची लोपामुद्रा राऊत हिच्यासोबत चांगलीच केमिस्ट्री जमली होती. त्याचबरोबर तो घरातील प्रबळ स्पर्धकांपैकी एक होता. मनवीर आणि त्याच्यात स्पर्धेच्या अखेरपर्यंत फारसे पटले नाही. बºयाचदा दोघांमध्ये टसनही बघावयास मिळाली. त्याचबरोबर स्वामी ओमबरोबरचा त्याचा वाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

Web Title: Rohan Mehra was seriously injured while working on the set; Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.